शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवण्यासाठी म्हापसा पालिका पोलिसांचे सहकार्य घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 17:11 IST

जगभरात शुक्रवारच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यातल्या म्हापसा मार्केटात वारंवार होणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्याचा ठराव म्हापसा पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला.

म्हापसा- जगभरात शुक्रवारच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यातल्या म्हापसा माकेर्टात वारंवार होणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्याचा ठराव म्हापसा पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला.  बाजार समितीचे मार्केटसंबंधी मांडलेल्या अहवालावर चर्चा करताना हे ठरवण्यात आले. पालिकेची बैठक नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी गौरेश शंखवाळकर उपस्थित होते. बाजार समितीने आपल्या अहवालात  मासळी मार्केट, भाजी मार्केट, फळमार्केट तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे बसवण्याची शिफारस केली आहे. पार्किंग व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याची शिफारस करताना उघड्यावर होणाºया नैसर्गिक विधीवर नियंत्रण ठेवण्याची तसेच प्रवेशद्वारावर अतिक्रमण करून विक्री करणाºया पाव विक्रेत्यांना हटविण्याची शिफारस केली आहे. बाजारपेठेतील सर्व विक्रेत्यांना ओखळपत्रे देणे, फूटपाथवरील अतिक्रमणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हटवणे तसेच रात्रीच्यावेळी बाजारपेठ सामानमुक्त करण्याची शिफारस करताना बाजारातील व्यवहारात सुसूत्रता आणण्याची शिफारस केली होती. केलेल्या शिफारशींवर पालिकेच्या सदस्यांनी आपली विविध मते मांडली. काही सदस्यांनी पालिकेच्या कर्मचाºयांकडून सहकार्य मिळत नसल्याचे आरोप केले. पालिकेच्या वतिने होणारी अतिक्रमणे हटवून सुद्धा ती थांबत नसल्याने वाढत्या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची मागणी सदस्यांच्या वतीने करण्यात आली. केलेली मागणी सर्वानुमते मंजूर करण्यात आली. पालिकेच्या वतिने म्हापसा पोलीस स्थानकातील उपअधीक्षकांना पत्र पाठवून बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवण्यास सहकार्य करण्याची विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला अशी माहिती नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी दिली.म्हापसा पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या केंद्रीय कारागृहातील कचरा उचलण्यासाठी कारागृह व्यवस्थापनाने जबाबदारी उचलावी अशी विनंती त्यांना करण्यात येणार आहे. तसेच पत्र पालिकेच्या वतिने कारागृहाच्या महानिरीक्षकांना पाठवण्यात येणार आहे. सध्या कारागृतील कचरा गोळा करण्याचे काम पालिकेच्या वतिने करण्यात येत असते. 

टॅग्स :Policeपोलिस