शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

देशाचा हरवलेला आत्मा पुन्हा मिळविण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 15:08 IST

२०१४ साली भारतभूमीवर दूध आणि मधाच्या नद्या वाहविण्याचे वचन देत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला सपाट केले आणि नवी आशा निर्माण केली. आता पाच वर्षांनंतर त्यांना पुन्हा संधी द्यायची का, असा सवाल आपण स्वत:लाच करत आहोत.

२०१४ साली भारतभूमीवर दूध आणि मधाच्या नद्या वाहविण्याचे वचन देत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला सपाट केले आणि नवी आशा निर्माण केली. आता पाच वर्षांनंतर त्यांना पुन्हा संधी द्यायची का, असा सवाल आपण स्वत:लाच करत आहोत. जर त्यांची सरशी झाली तर आपल्या लोकतांत्रिक प्रजासत्ताकाचे स्वरूप काय राहील, असा प्रश्न आपल्याला पडला आहे. ९ सप्टेंबर २०१८ रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला उद्देशून केलेल्या भाषणात अमित शहा म्हणाले होते, ‘जर आपण २०१९ साली विजय प्राप्त केला तर पुढच्या ५० वर्षांसाठी आम्हीच सत्तेत असू.’ देशाच्या वतीने मोदींच्या हुकूमशाहीला त्यांनी अशा प्रकारे आवतणे दिलेय.

नियोजन आयोगाला निकामी करत मोदींच्या सत्तेची सुरुवात झाली आणि आस्ते-आस्ते त्यांनी आपल्या लोकतांत्रिक प्रजासत्ताकाच्या संस्थात्मक पायालाच ठिसूळ करून टाकले आहे. ज्यांच्याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान आहे ते लोकशाहीचे दोन स्तंभ अर्थात सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगही तणावाखाली आहेत. चार न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेने न्यायपालिकेला घोळात घेतले जात असल्याचे संकेत दिले. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रीय आयोग नेमण्याच्या सरकारच्या आग्रहामागे काय आहे हे न्या. के. एम. जोजेफ यांच्या नियुक्तीत घातलेल्या घोळाने आणि गोपाल सुब्रह्मण्यम यांच्या पदोन्नतीने दाखवून दिलेय. निवडणूक आयोगाच्या पतनाच्या कथाही रोचक आहेत. रघुराम राजन आणि त्यांच्यानंतर उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेला केलेला रामराम देशातील अग्रणी संस्थांमधल्या अश्लाघ्य हस्तक्षेपाकडे निर्देश करण्यासाठी पुरेसे आहेत.

संवाद, चर्चा आणि असहमती यांचा गळा घोटण्याचे काम या सत्तेने केलेय. पुलवामा हल्ला आणि बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर तर असहमतीसाठीचा अवकाश आणखीनच आक्रसलाय. किंचाळणाऱ्या अँकरच्या फौजेने नवनव्या वाहिन्यांवरून पाकिस्तानला धडा शिकविण्याचे हाकारे घालत परिस्थिती चिघळती ठेवलीय. युद्धज्वर निर्माण करण्याचे श्रेय राष्ट्रवादाच्या मोदी ब्रॅण्डला द्यावे लागेल.

‘सबका साथ सबका विकास’चा नारा ऐकताना आपल्याला चांगले दिवस आल्याचे वाटले होते. मात्र, आता माणसांना जमावाकडून ठेचून मारले जात आहे. मोहम्मद अखलाक, रकबर खान, पेलू खान यांची निर्घृण हत्या झाल्यानंतरचा काही केंद्रीय मंत्र्यांचा आनंदोत्सव आणि पंतप्रधानांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष नीतिमत्तेचा एक नवा निम्नस्तर दाखवून गेले.

बहुसंख्याकांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांचे ध्रुवीकरण करत त्यांना अल्पसंख्याकांच्या विरोधात उभे करण्याचा हा डाव आहे. याच अभिनिवेशाने नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा बळी घेतला. द्वेश आणि गोप्रेम यांच्या रसायनावर बेतलेला हा देश, देशप्रेम आणि राष्ट्रवादाचा डोस देशाला विघटनाच्या दिशेने नेतो आहे.

बाबरी मशिदीचे पतन आणि गुजरात दंग्यांसाठी जनसमूहाचे झालेले एकत्रीकरण भारत या कल्पनेलाच सुरुंग लावून गेले. या संघटनातून निवडणुका जिंकल्या गेल्या असल्या तरी देशाचे नुकसान झालेले आहे. जमावाच्या आधारे होणाºया भयनिर्मितीतून लोकतांत्रिक प्रजासत्ताक देशाचा आत्माच हरवत चाललाय. अर्थव्यवस्थेचे मातेरे होत असताना सरकारला क्षमा कशी करायची? येथे तर दाखविण्यापुरतेही काहीच दिसत नाही. निश्चलनीकरणातून तर देशबांधवांच्या हालअपेष्टांत नवी भर पडली.

ही निवडणूक आहे देशाचा हरवलेला आत्मा पुन्हा प्राप्त करण्यासाठीची. सत्ताधाऱ्यांची ताकद गृहीत कमी लेखून चालणार नाही. पंतप्रधानांची लोकप्रियता कायम आहे. आपल्या प्रतिमेचे विपणन अद्वितीय कौशल्याने करताहेत.देशभर अस्तित्व असलेल्या कॉँग्रेसकडे आजच्या सत्ताधीशांना सत्ताभ्रष्ट करण्याची जबाबदारी आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवाने तो पक्ष अजय नसल्याचे दाखवून दिलेय. पुलवामा पश्चात उद्भवलेल्या स्थितीत देशाचा हरवलेला आत्मा पुन्हा प्राप्त करण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. आपल्या देशाच्या समृद्ध विवधतेचा गळा घोटणाºया धार्मिक राष्ट्रवादाचे उच्चाटन करून सर्वसमावेशक लोकशाहीच्या पुन:स्थापनेद्वारे राज्यघटनेतल्या तत्त्वांना नवसंजीवनी देणे अगत्याचे आहे.

देशाने १९७७ साली आणि त्यानंतर २००४ साली हे आव्हान लिलया पेलले. त्यावेळच्या पंतप्रधानांना आपल्या आसनाखाली वडवानल पेटल्याचे कळलेदेखील नव्हते. त्याचीच पुनरावृत्ती आतादेखील होऊ शकते.

- क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो (ज्येष्ठ विधिज्ञ)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgoaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहा