लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; दोडामार्ग येथील युवकास अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: June 1, 2023 20:12 IST2023-06-01T20:12:01+5:302023-06-01T20:12:14+5:30

लग्नाचे आमिष दाखवून गिरी सरपंचाकडून कथील बलात्काराचे प्रकरण ताजेअसताना लैंगीक शौषणाचा आणखिन एक प्रकार बार्देशातून समोर आला आहे.

Rape by pretense of marriage Youth from Dodamarg arrested | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; दोडामार्ग येथील युवकास अटक

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; दोडामार्ग येथील युवकास अटक

लग्नाचे आमिष दाखवून गिरी सरपंचाकडून कथील बलात्काराचे प्रकरण ताजेअसताना लैंगीक शौषणाचा आणखिन एक प्रकार बार्देशातून समोर आला आहे. लग्नाचेआमिष दाखवत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन पीडितेचे लैंगिक शोषण करणा‍ºया तरुणाविरोधात म्हापसा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झालाय.  ही बलात्कारची घटना बार्देश तालुक्यात घडली आहे. राहुल शिवा नाईक (३४, न्यू वाडा, दोडामार्ग, गोवा) असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पीडित घटस्फोटीत महिलेने बुधवारी पोलिस तक्रार दिली होती.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, पीडित महिला हिचा स्वत:चा हॉटेल व्यवसाय आहे. याच हॉटेलवर तिची संशयितशी ओळख झाली. त्याचे रुपांतर मैत्रित झाले व कालांतराने संशयित आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखविले. यातूनच त्याने १९ मार्च २०२३ ते २० मार्च २०२३ दरम्यान, पीडित महिलेशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर, संशयिताने पीडितेला लग्नास नकार दिला असता तिने पोलिस स्थानकात या प्रकरणाबाबत लेखी तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणातील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे. 

Web Title: Rape by pretense of marriage Youth from Dodamarg arrested