शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

रमाकांत खलपांनी केला होता श्रीपाद नाईकांचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2024 08:42 IST

एकेकाळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे बळ गोव्यात खूप मोठे होते आणि खलप त्या पक्षाचे सर्वात प्रभावी नेते होते. आता परिस्थिती पूर्ण बदललीय.

सदगुरू पाटील, निवासी संपादक

कोणत्या राजकीय नेत्याची भेट कुणाशी कोणत्या टप्प्यावर होईल हे सांगता येत नाही. आजचे राजकीय प्रतिस्पर्धी एकेकाळी एकमेकांचे साथीदेखील असतात, आता काहीजणांचा विश्वास बसणार नाही; पण ही गोष्ट खरी की, एकेकाळी रमाकांत खलप यांनी मडकई मतदारसंघात जाऊन श्रीपाद नाईक यांचा प्रचार केला होता. रमाकांत खलप आज उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून श्रीपाद नाईक यांच्याविरुद्ध लढत आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक भाजपचे उमेदवार आहेत आणि खलप रोज भाऊंविरुद्ध तोफ डागत आहेत. श्रीपादभाऊही खलपांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. या पार्श्वभूमीवर १९९४ नंतरचा काळ काहीजणांना आठवतो.

एकेकाळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे बळ गोव्यात खूप मोठे होते आणि खलप हे त्या पक्षाचे सर्वात प्रभावी व लोकप्रिय नेते होते. १९९४ साली म.गो. आणि भाजपची युती झाली होती. ९४च्या विधानसभा निवडणुकीवेळी ती युती झाली नसती तर कदाचित ९४ साली मडकईत श्रीपाद नाईक जिंकलेही नसते असे जुन्या काळातील कार्यकर्त्यांना वाटते. त्या निवडणुकीत युती असूनही मांद्रे मतदारसंघात खलप मात्र हरले. चक्क संगीता परब यांनी खलपांचा पराभव केला होता. खलपभाईना वाटते की, भाजपने त्यावेळी आपल्याशी दगाबाजी केली. त्यावेळी भाजपची मांद्रेतील मते मगो पक्षाकडे न वळविता ती चक्क काँग्रेसकडे वळवली गेली असा खलपांचा दावा आहे. त्यात किती तथ्य आहे किंवा नाही ते आता कळत नाही. संगीता परब तेव्हा काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि खलपांसमोर तर त्या नवख्याच होत्या.

खलपांनी काल फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात की, ९४च्या विधानसभा निवडणुकीवेळी मडकईत आपण श्रीपाद नाईक यांचा प्रचार केला होता. अर्थात ते खरेच आहे. श्रीपादभाऊ युतीचे उमेदवार होते. भाजपतर्फे ते लढत होते. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी हे राष्ट्रीय स्तरावरील भाजपचे अत्यंत प्रबळ नेते होते. अडवाणी त्या निवडणुकीवेळी श्रीपाद नाईक यांच्या प्रचारासाठी गोव्यात आले होते. खलप म्हणतात की, अडवाणींसोबत त्यावेळी आपण श्रीपादजींचा प्रचार केला होता. अर्थात त्या निवडणुकीत भाजपला चार जागा जिंकता आल्या होत्या. पणजीत मनोहर पर्रीकर, वाळपईत नरहरी हळदणकर, मडगावमध्ये दिगंबर कामत आणि मडकईत श्रीपाद नाईक. त्यावेळी सुदिन ढवळीकर यांचा राजकीय उदय झाला नव्हता. ढवळीकर तेव्हा रिंगणात नव्हते. मडकईत त्यावेळी रवी नाईक काँग्रेसचे उमेदवार होते आणि श्रीपाद नाईक यांनी चक्क रवींचा पराभव केला होता. दोघेही भंडारी समाजातील नेते. आज ते दोघेही भाजपमध्ये आहेत आणि दिगंबर कामतदेखील. या उलट खलप आता काँग्रेसमध्ये, तरपर्रीकर हयात नाहीत.

खलप यांना वाटते की, ९४च्या निवडणुकीत भाजपने मगो पक्षाशी युती करूनही कुंभारजुवेत धर्मा चोडणकर यांचाही पराभव भाजपनेच केला होता. मगो पक्षाऐवजी कुंभारजुवेतही भाजपने आपली मते काँग्रेसकडे वळवली होती, असा खलपांचा दावा आहे. त्या निवडणुकीवेळी प्रियोळमध्ये डॉ. काशीनाथ जल्मी यांनाही भाजपने मते दिली नव्हती. पण जल्मी कसेबसे त्यावेळी पराभवापासून वाचले. अर्थात खलप यांचा हा दावा आज सर्वार्थाने मान्य होणार नाही; पण खलप यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून इतिहासाला थोडा उजाळा दिल्याचे जाणवते.

१९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी मात्र मगो व भाजप यांची युती झालीच नाही. खलप तत्पूर्वी ९६ साली लोकसभा निवडणूक जिंकून केंद्रात मंत्रीही झाले होते. ९६च्या लोकसभा निवडणुकीवेळी मनोहर पर्रीकर उत्तर गोव्यातून खलपांविरुद्ध लढले होते. त्यात खलप विजयी झाले, ९९च्या विधानसभा निवडणुकीवेळी समजा मगो- भाजप युती झाली असती तर श्रीपाद नाईक मडकईत जिंकले असते. पण युती झाली नाही आणि मडकईची जागा मगोपला गेली. सुदिन ढवळीकर यांनी ९९ साली प्रथमच मडकई मतदारसंघ जिंकला आणि आजपर्यंत सलग ते मडकईचे राजेच होऊन बसले आहेत. तिथे त्यांचा पराभव झाला नाही. श्रीपादभाऊंचा पराभव ढवळीकरांनी केला होता. पुढे भाऊ चक्क लोकसभेत पोहोचले आणि तेही आजपर्यंत अपराजित आहेत. भाईंना मागे टाकून भाऊ कष्टाने खूप पुढे पोहोचले, हेही मान्य करावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा