विनू मंकड क्रिकेट चषक स्पर्धेसाठी गोव्याचे नेतृत्व राहुल मेहताकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 21:38 IST2018-10-02T21:37:48+5:302018-10-02T21:38:11+5:30

६ आॅक्टोबरला तामिळनाडूविरुद्ध होणार पहिला सामना

rahul mehta to lead goa in vinoo mankad trophy | विनू मंकड क्रिकेट चषक स्पर्धेसाठी गोव्याचे नेतृत्व राहुल मेहताकडे

विनू मंकड क्रिकेट चषक स्पर्धेसाठी गोव्याचे नेतृत्व राहुल मेहताकडे

पणजी : जयपूर (राजस्थान) येथे ६ ते २१ आॅक्टोबरदरम्यान खेळविण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील विनू मंकड क्रिकेट चषक स्पर्धेसाठी गोवा संघाची निवड करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व राहुल मेहताकडे सोपविण्यात आले आहे. गोवा क्रिकेट संघटेनेतर्फे या संघाची निवड करण्यात आली. मडगाव क्रिकेट क्लबचा खेळाडू असलेल्या राहुलने गेल्या सत्रात १६ वर्षांखालील संघाकडून शानदार प्रदर्शन केले होते. त्यानंतर तो १९ वर्षांखालील संघातही खेळला होता. भविष्यातील एक उत्तम रणजीपटू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. त्याच्याकडे गोव्याच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गोव्याचा पहिला सामना ६ आॅक्टोबर रोजी तामिळनाडूविरुद्ध खेळला जाणार आहे.

असा असेल संघ : राहुल मेहता (कर्णधार), आलम खान, साईश कामत, उदित यादव, यश परब, गौरीश कांबळी, दिगेश रायकर, ऋत्विक नाईक, समित आर्यन मिश्रा, शदाब खान, शुभम तारी, क्रिश्ना ठाकूर, मोहित रेडकर, उमंग गोसावी, ऋशज तळावलीकर.
गोव्याचा कार्यक्रम असा : ६ आॅक्टोबर- गोवा वि. तामिळनाडू, ८ आॅक्टोबर- राजस्थानविरुद्ध, ९ आॅक्टोबर- हिमाचल प्रदेशविरुद्ध, ११ आॅक्टोबर- सौराष्ट्रविरुद्ध, १३ आॅक्टोबर- जम्मू काश्मीरविरुद्ध, १७ आॅक्टोबर- ओडिशाविरुद्ध, २१ आॅक्टोबर- केरळविरुद्ध.

 

Web Title: rahul mehta to lead goa in vinoo mankad trophy

टॅग्स :goaगोवा