सिलिंडरसाठी रांगा, वितरण सुरळीत; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:53 IST2026-03-15T12:52:45+5:302026-03-15T12:53:36+5:30

घरगुती वापराचे सिलिंड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.

queues for cylinders in goa distribution smooth appeal not to fall prey to rumors | सिलिंडरसाठी रांगा, वितरण सुरळीत; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

सिलिंडरसाठी रांगा, वितरण सुरळीत; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव: आखाती युद्धाच्या भडक्यामुळे सध्या एलपीजी गॅसचा पुरवठा भारतामध्ये किंचित प्रमाणामध्ये विस्कळीत झालेला आहे. परंतु, पुढे गॅस सिलिंडर मिळेल किंवा नाही, या भीतीपोटी ग्राहकांनी शनिवारी रिकामे सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीच्या समोर रांगा लावलेल्या होत्या.

सद्यःस्थितीमध्ये वाळपईमध्ये पुरेसे गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत. येथील गॅस एजन्सीमध्ये साडेतीनशेच्या आसपास सिलिंडरचा साठा उपलब्ध होता. हे सिलिंडर ग्राहकांना सुरळीत वितरित केले जात होते. संध्याकाळी रांग ओसरली. ग्राहकांना गॅस सिलिंडर उपलब्ध केले गेले. नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. काळाबाजार होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.

लोकांना गॅस सिलिंडरचे वितरण योग्य प्रकारे व्हावे म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नाहीत. परंतु, घरगुती वापराचे सिलिंड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.

लोकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडून घाबरून जाऊन य ठिकाणी येऊन रांगा लावू नयेत. पंचवीस दिवसांनंतर प्रत्येक ग्राहकाला दुसरा सिलिंडर उपलब्ध होणार आहे. लोकांनी गडबड केली तर पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिक पुरवठा खात्याने आवाहन केले आहे की, कोणीही घाबरून जाऊ नये तसेच अनावश्यक रांगा लावून वितरण व्यवस्थेवर ताण आणू नये.

नियमित स्वरूपामध्ये घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध केले जातील, असे आश्वासनही नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
 

Web Title : गैस सिलेंडर के लिए कतारें कम हुईं; आपूर्ति सुचारू, अफवाहों से बचें

Web Summary : खाड़ी संकट के कारण एलपीजी आपूर्ति थोड़ी बाधित है। पर्याप्त गैस सिलेंडर उपलब्ध हैं, वितरण सुचारू है। नागरिकों से अनुरोध है कि वे घबराएं नहीं या अनावश्यक रूप से कतार में न लगें, क्योंकि आपूर्ति नियमित है। अधिकारियों ने पर्याप्त घरेलू गैस सिलेंडर उपलब्धता का आश्वासन दिया।

Web Title : Gas Cylinder Queues Ease; Supply Smooth, Don't Panic Urges Authority

Web Summary : LPG supply is slightly disrupted due to the Gulf crisis. Ample gas cylinders are available, distribution is smooth. Citizens are urged not to panic or queue unnecessarily, as supplies are regular. Authorities assure sufficient domestic gas cylinder availability.