डिझेल तुटवड्यासह दरवाढीचा 'कदंब' बस सेवेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:09 IST2026-03-27T14:08:07+5:302026-03-27T14:09:11+5:30

कदंब महामंडळाच्या बससेवेला डिझेल तुटवडा आणि दरवाढीचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.

price hike along with diesel shortage hits kadamba bus service | डिझेल तुटवड्यासह दरवाढीचा 'कदंब' बस सेवेला फटका

डिझेल तुटवड्यासह दरवाढीचा 'कदंब' बस सेवेला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कदंब महामंडळाच्या बससेवेला डिझेल तुटवडा आणि दरवाढीचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कदंबसाठी डिझेलचा दर प्रति लिटर ११० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर खासगी बस सेवेसाठी हा दर ८८.२० रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच महामंडळासाठी सुमारे २२ रुपये जास्त दर आकारला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सध्या काही प्रमाणात डिझेल तुटवडा जाणवत असला तरी कदंब बससेवा बंद केली जाणार नाही, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष, आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न : तुयेकर

दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व बस नियोजित वेळापत्रकानुसार चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढ आणि पुरवठ्यातील अडचणी असूनही सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे अध्यक्ष आमदार तुयेकर स्पष्ट केले. तसेच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. सर्व मार्गावरील बससेवा सुरळीत राहील याची खबरदारी कदंब महामंडळाच्यावतीने घेतली जात असल्याचे ते म्हणाले.

 

Web Title : डीजल की कमी और मूल्य वृद्धि से कदंब बस सेवा प्रभावित

Web Summary : डीजल की कमी और कीमतों में वृद्धि से कदंब बस सेवा प्रभावित है। निजी ऑपरेटरों की तुलना में दरें काफी अधिक हैं। अधिकारियों का कहना है कि यात्रियों की सुविधा को प्राथमिकता देते हुए बस सेवाएं निर्धारित समय पर जारी रहेंगी और सभी मार्गों पर सुचारू संचालन बनाए रखने के लिए समन्वय किया जा रहा है।

Web Title : Diesel Shortage, Price Hike Hit Kadamba Bus Service Hard

Web Summary : Kadamba bus service faces diesel shortage and higher prices, with rates significantly exceeding those for private operators. Despite challenges, authorities assure that bus services will continue as scheduled, prioritizing passenger convenience and coordinating to maintain smooth operations across all routes.