फोंडा पोटनिवडणूक: मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझीटसह सात सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:15 IST2026-03-27T14:15:18+5:302026-03-27T14:15:18+5:30

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक सूचना

ponda bypoll election 2026 seven facilities including mobile deposit at polling stations | फोंडा पोटनिवडणूक: मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझीटसह सात सुविधा

फोंडा पोटनिवडणूक: मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझीटसह सात सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क,  पणजी : भारतीय निवडणूक आयोगाने फोंडा विधानसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. मतदारांना मतदानाचा अनुभव सुखद मिळावा यासाठी विशेष पावले उचलली आहेत. केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मोबाईल डिपॉझिट सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार फोंड्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर 'किमान आश्वासित सुविधा' पुरवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे शुद्ध पाणी, सावलीसाठी प्रतीक्षा क्षेत्र, पाण्याची सोय असलेले शौचालय आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था यांसारख्या मूलभूत सोयींचा समावेश आहे.

मतदारांच्या मदतीसाठी प्रत्येक केंद्राबाहेर 'मतदार साहाय्य कक्ष उभारला जाणार असून, तेथे तैनात असलेले बीएलओ आणि इतर अधिकारी मतदारांना त्यांचा बूथ क्रमांक आणि मतदार यादीतील अनुक्रमांक शोधण्यास मदत करतील. तसेच मतदान केंद्रावर चार प्रकारचे अधिकृत पोस्टर्स लावले जातील. ज्यामध्ये उमेदवारांची यादी, आवश्यक ओळखपत्रे आणि मतदानाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केलेली असेल.

वास्तविक हा आदेश देशातील सर्वच मतदान केंद्रांना लागू होत असून याच काळात फोंड्यात पोटनिवडणुका होत असल्यामुळे या मतदारसंघातही तो लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी मतदारांच्या सोयीसाठी काही नवीन उपक्रम राबवले जात आहेत.

मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मोबाईल डिपॉझिट सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे, जिथे मतदार आपले फोन बंद करून स्वयंसेवकाकडे सुरक्षितपणे जमा करतील आणि मतदान करून आल्यावर ते परत मिळवू शकतील.

बसण्यासाठी बाकांची व्यवस्था

रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून ठराविक अंतरावर बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक केंद्रावर योग्य उतार असलेले रॅम्प आणि इतर सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

 

Web Title : पोंडा उपचुनाव: मतदान केंद्रों पर मोबाइल डिपॉजिट सहित सात सुविधाएँ

Web Summary : पोंडा उपचुनाव के लिए मतदान केंद्र तैयार: मोबाइल डिपॉजिट, बैठने की व्यवस्था, रैंप, सहायता बूथ, स्पष्ट साइनेज, पानी, शौचालय और प्रकाश व्यवस्था सुनिश्चित।

Web Title : Ponda By-election: Mobile Deposit & Seven Facilities at Polling Booths

Web Summary : Fonda by-election ready with assured facilities: mobile deposit, seating, ramps, assistance booths, clear signage, water, toilets, and lighting ensure smooth voting.