लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव/पणजी: दक्षिण गोव्यातील काकोडा-कुडचडे परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणात आता क्राईम ब्रँचने आपला सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील संशयित, सोहम सुशांत नाईक याच्या कुडचडेतील निवासस्थानी गुरुवारी क्राईम ब्रँचच्या पथकाने छापा टाकला.
दरम्यान, लैंगिक अत्याचार आणि छळवणुकीचे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने त्याचा तपास तातडीने 'क्राईम ब्रँच'कडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि पीडित मुलीची ओळख सुरक्षित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुख्य संशयित सोहम सुशांत नाईक याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयितावर पोक्सो कायदा आणि गोता बाल कायद्याच्या विविध कलमांनुसार दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे आणि सोशल मीडियाद्वारे अश्लील फोटो पाठवून तिला धमकावणे, असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.
सुरुवातीला या प्रकरणात तक्रार नोंदवण्यास विलंब होत असल्याचा आरोप करत कुडचडे येथील नागरिकांनी पोलिस स्थानकावर मोठा मोर्चा काढला होता. लोकांचा वाढता संताप आणि प्रकरणाची व्याप्ती पाहता आता क्राईम बॅच या प्रकरणाचा व्यावसायिक आणि अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करणार आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात इतर कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदारांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवली जातील, असेही पोलिसांनी आश्वासित केले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, स्थानिक नागरिकांनी हा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली होती. जनतेचा वाढता रोष आणि तपासाची निकड ओळखून क्राईम ब्रँचने तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. या प्रकरणात आणखी काही पीडित युवती पुढे येण्याची शक्यता व्यक्त आहे.
विशेष पथकाकडून झाडाझडती
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी तपासाच्या पहिल्या टप्प्यात क्राईम ब्रँचचे एक विशेष पथक संशयित सोहम नाईक याच्या घराकडे पोहोचले. क्राइम ब्रँचचे निरीक्षक परेश नाईक यांच्यासह पथकाने या गुन्ह्याच्या अनुषंगाने शोधमोहीम सुरू केली. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सोहमच्या घराची कसून झडती घेतली असून, या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे किंवा दस्तऐवज हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही शोधमोहीम बराच काळ सुरू होती.
निरीक्षक परेश नाईक तपास अधिकारी
कुडचडे येथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हा शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर गुन्हा शाखेचे निरीक्षक परेश नाईक यांना तपास अधिकारी चनविण्यात आले आहे. निरीक्षक नाईक व त्यांची टीम कुडचडे येथे दाखल होऊन संशयित सोहम नाईक याच्या चराची झडतीही घेतली. काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल झाले होते. यापैकी माध्यमांतील वृत्ताची दखल चेऊन जो गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या प्रकरणाचा तपास परेश नाईक हे करीत आहेत.
Web Summary : Crime Branch raided Soham Naik's residence in Kudchade, Goa, amid a sex scandal investigation. Soham was arrested and faces charges under POCSO Act. Police urge other potential victims to come forward, assuring confidentiality. Investigation underway.
Web Summary : गोवा के कुडचडे में क्राइम ब्रांच ने सोहम नाइक के घर पर छापा मारा, जो एक सेक्स स्कैंडल की जांच का हिस्सा था। सोहम को गिरफ्तार किया गया और उस पर पोक्सो एक्ट के तहत आरोप लगाए गए हैं। पुलिस अन्य संभावित पीड़ितों से आगे आने का आग्रह करती है, गोपनीयता का आश्वासन देती है। जांच जारी है।