साखळीत फार्मसी कॉलेज साकारणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:13 IST2025-06-19T11:10:51+5:302025-06-19T11:13:58+5:30

साखळी महाविद्यालयात करिअर उडानचे उद्घाटन

pharmacy college to be built in the sakhali said cm pramod sawant | साखळीत फार्मसी कॉलेज साकारणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

साखळीत फार्मसी कॉलेज साकारणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: साखळी सारख्या शहरात शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणताना शैक्षणिक विकासाबरोबरच कौशल्य विकासावर भर देत वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था उभारण्यात आल्या. लवकरच साखळीत फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

गोवा राज्य उच्च शिक्षण परिषदेने सुरू केलेला 'करिअर उडान-एम्पॉवरिंग युथ फॉर अ ब्राइटर टुमारो' हा परिवर्तनकारी उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत साखळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. शैक्षणिक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असून कौशल्य विकसित करणारा विद्यार्थी शंभर टक्के रोजगार प्राप्त करू शकतो. त्या दृष्टीनेच आम्ही महाविद्यालयात वेगवेगळे कोर्सेस साखळी भागात सुरू केल्याचे ते म्हणाले. 

करिअर उडान सोबत, 'करिअर कंपास हँडबुक' लाँच केले आहे, जे देशातील पहिला उपक्रम असून, गोव्यातील शाळा आणि ग्रंथालयांमध्ये वितरित केले गेले आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना उद्योन्मुख क्षेत्रात संधी उपलब्ध करण्यासाठी करिअर मार्गदर्शक म्हणून काम करते. अनेक कोर्स बद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करताना, करियर निवडताना घेण्याची काळजी, कोणत्या प्रकारचे कौशल्य विकसित होणे अपेक्षित आहे व उपलब्ध कोर्सेस याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कुशल पिढीचा संकल्प

करिअर उडान ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येक तालुक्यात योजनांसह तरुणांना सक्षम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत. एकत्रितपणे, विकसित भारत २०४७ आणि विकसित गोवा २०३७ च्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सज्ज असलेली कुशल पिढी निर्माणचा संकल्प आहे.
 

Web Title: pharmacy college to be built in the sakhali said cm pramod sawant