शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

सरकारकडून कोंडी, आमदार गावकर यांचा महामंडळास रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 7:33 PM

सरकारने गेले चौदा महिने नव्या योजना राबविण्यास सहकार्य केले नाही. महामंडळासाठी निधी व अधिकारी वर्गही पुरविला नाही असे सांगत सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गावकर यांनी मंगळवारी सरकारी वन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला.

पणजी : सरकारने गेले चौदा महिने नव्या योजना राबविण्यास सहकार्य केले नाही. महामंडळासाठी निधी व अधिकारी वर्गही पुरविला नाही असे सांगत सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गावकर यांनी मंगळवारी सरकारी वन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला. प्रशासन ठप्प झालेले आहे, अशीही टीका गावकर यांनी केली.

गावकर हे नाराज असल्याचा अंदाज सर्वानाच आला होता. गावकर हे सोमवारी राजभवनवर भाजपाच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीलाही उपस्थित राहिले नव्हते. गावकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषद घेतली व आपण चौदा महिन्यानंतर आता महामंडळाच्या चेअरमनपचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. हे महामंडळ म्हणजे सरकारला कचरा पेटी वाटते. चार महिने महामंडळासाठी व्यवस्थापकीय संचालक सरकारने दिले नव्हते. आता अतिरिक्त ताबा असलेला अधिकारी दिला आहे. आपण काजू विकास व काजू बागायत पुनरुज्जीवनाची योजना सरकारकडे पाठवली होती. तिनवेळा सरकारने ती योजना फेटाळून लावली असे गावकर यांनी सांगितले.

वन खाते हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे आहे असे नमूद करून गावकर म्हणाले की, सरकारकडून मला सहकार्य लाभत नसल्याने या पदावर राहण्यात अर्थ नाही. माझा सरकारला पाठींबा आहे, पण यापुढे जास्त विचार करावा लागेल. मला सांगेतील लोकांशी बोलावे लागेल. दरवेळी सांगेच्या आमदाराला फक्त सरकार स्थापन करण्यासाठी जवळ घेतले जाते. मग सांगेची उपेक्षा केली जाते. मला दिलेल्या वन विकास महामंडळाला सरकारने निधी देखील दिला नाही. 

हा उपाय कायमस्वरुपी नव्हे... मी सहा आमदारांच्या जी-सहा गटात सहभागी झालो होतो. आम्हा सहाहीजणांचा समान असा हेतू होता. सरकारबाबत कायमस्वरुपी तोडगा हवा अशी मागणी आम्ही भाजपाच्या निरीक्षकांसमोर ठेवली होती. सोमवारी मंत्रिमंडळात जे बदल झाले आहेत, तो कायमस्वरुपी तोडगा असे मला वाटत नाही, असे गावकर म्हणाले. मला सरकारने योग्य ते स्थान द्यायला हवे, कारण मी पर्रीकर सरकारला पाठींबा दिलेला आहे, असे पाचही आमदारांनी भाजप निरीक्षकांना सांगितले होते, असे गावकर म्हणाले. 

लोक खूप अस्वस्थ... सांगेच्या खाणपट्टय़ातील लोक खूप अस्वस्थ आहेत. प्रशासन ठप्प झालेय. खाणी सुरू होत नाहीत. त्यामुळे लोक अडचणीत आहेत व आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला लोक खूप प्रश्न विचारतात. तुम्ही वन विकास महामंडळावर राहून काय केले असे लोकांनी मला यापुढे विचारायला नको म्हणून मी राजीनामा देतोय. कारण काही करण्यासाठी मला सरकारचा पाठींबाच मिळत नाही, असे गावकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा