पणजीत करनाटकी धरणे उधळले!
By Admin | Updated: October 17, 2015 02:09 IST2015-10-17T02:09:30+5:302015-10-17T02:09:36+5:30
पणजी : म्हादई नदीचे पाणी वळविण्याची कर्नाटक सरकारने जी योजना आखली आहे, त्यास पाठिंब्यासाठी पणजीतील आझाद मैदानावर धरणे धरण्याचा

पणजीत करनाटकी धरणे उधळले!
पणजी : म्हादई नदीचे पाणी वळविण्याची कर्नाटक सरकारने जी योजना आखली आहे, त्यास पाठिंब्यासाठी पणजीतील आझाद मैदानावर धरणे धरण्याचा कर्नाटकमधील काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी केलेला प्रयत्न सपशेल फसला. गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी हे धरणे उधळून लावले.
कन्नडीगांचा एक गट सकाळी पणजीत दाखल झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील आझाद मैदानावर हा गट आला. मैदानावर धरणे धरून कर्नाटकला पाठिंबा द्यायचा व मग गोवा सरकारला निवेदन द्यायचे, असा या गटाचा बेत होता. तथापि, गोव्यातील पर्यावरणप्रेमीही या वेळी आझाद मैदानावर जमले व त्यांनी या गटास विरोध केला. या वेळी आझाद मैदानाच्या सर्व प्रवेशद्वारांवर मोठ्या संख्येने पोलीस होते. पर्यावरणप्रेमी तथा म्हादई बचाव अभियानाचे नेते राजेंद्र केरकर, डॉ. दत्ताराम देसाई, मधू गावकर, पत्रकार सागर जावडेकर, आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे (पान २ वर)