संघटनेच्या फसव्या नियोजनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 00:41 IST2018-09-11T00:29:36+5:302018-09-11T00:41:50+5:30

कोणत्याही क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी ही संबंधित फेडरेशन तसेच स्थानिक संघटनेची असते.

The organization's fraudulent planning hit | संघटनेच्या फसव्या नियोजनाचा फटका

संघटनेच्या फसव्या नियोजनाचा फटका

पणजी : कोणत्याही क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी ही संबंधित फेडरेशन तसेच स्थानिक संघटनेची असते. असे असताना फसव्या नियोजनचा फटका खेळाडूंना बसल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री गोव्यात घडली. २४व्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी आलेल्या विविध राज्यांतील खेळाडूंना हॉटेल्सची बिले न दिल्याने हॉटेलचालकांनी रोखून धरले होते. यामुळे काहींच्या रेल्वे चुकल्या, तर काहींना मानसिक त्रास सहन करावा लागला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले होते. अखेर खेळाडूंची सुटका करण्यात आली. जवळपास ४०० हून अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
सुरुवातीला ही स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर होणार होती. परंतु, काही कारणामुळे ऐनवेळी ती बीपीएस स्पोटर््स क्लब-मडगाव येथे ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली. स्पर्धेसाठी गोवा किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष मंजुनाथ तंगडगी यांनी भारतीय किक बॉक्सिंग संघटनेशी (आयएकेओ) पत्रव्यवहार केला होता. यावर आयएकेओचे अध्यक्ष एस.एस. हरिचंद्रन यांनी स्पर्धेसाठी मान्यता दिली. आएकेओकडून स्पर्धेसाठी जवळपास ६ लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यात खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था याचा समावेश होता. मात्र, स्थानिक अध्यक्ष मंजुनाथ यांनी हॉटेल्सची बिले दिली नसल्याने खेळाडूंना हॉटेल सोडता आले नाही, असे भारतीय किक बॉक्सिंग संघटनेचे सचिव प्रदीप शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सचिव प्रदीप शिंदे यांनी पुढे म्हटले की, ‘यजमान म्हणून अध्यक्ष मंजुनाथ त्यांच्यावर स्पर्धेची जबाबदारी होती. आमच्याकडून आम्ही संघटनेला आर्थिक मदतही केली होती. खेळाडूंना रोखून धरल्याचे कळताच मी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्याचप्रमाणे, ‘बिले देण्याची हमी दिल्यानंतर खेळाडूंची सुटका करण्यात आली.’ असेही शिंदे म्हणाले. या संदर्भात मंजुनाथ यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.
>स्थानिक संघटनेवर निलंबनाची कारवाई?
खेळाडूंना झालेल्या त्रासास स्थानिक संघटना कारणीभूत आहे. त्यांनी करारानुसार स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळली नाही. त्यांच्यामुळे खेळाडूंना त्रासात पडावे लागले. त्यांनी आमच्याकडे स्पर्धेचा प्रस्ताव पाठविला होता. सर्व अटी मंजूर करीत आम्ही ही स्पर्धा गोवा किक बॉक्सिंगकडे सोपविली.खेळाडूंच्या भोजन आणि निवासाची जबाबदारी याच संघटनेची होती. मात्र, त्यांनी हॉटेल्सची बिले अदा केली नाहीत. त्यामुळे खेळाडूंना त्रास झाला. या गंभीर प्रकरणाबाबत आम्ही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहोत, तसेच आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे, असे प्रदीप शिंदे यांनी सांगितले.

Web Title: The organization's fraudulent planning hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.