शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र क्षेत्रामुळे फक्त १ हजार २७४ घरांचा प्रश्न; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:03 IST

नियोजित व्याघ्र क्षेत्रात एक लाख लोक राहत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: व्याघ्र क्षेत्र निश्चित करून अधिसूचित करणे ही प्रक्रिया गोव्याच्या हिताची आहे. गोव्याचे जल व जंगल हे दोन्ही त्यामुळे राखले जाईल, असे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे मत आहे. 

नियोजित व्याघ्र क्षेत्रात एक लाख लोक राहत नाहीत. फक्त १ हजार २७४ घरे आहेत. म्हणजेच चार ते हजार पाच एवढीच लोकवस्ती असून, त्या १ हजार २७४ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे, असेही त्यांनी नमूद केले.

केरकर यांनी एका वृत्त वाहिनीला काल मुलाखत दिली. यावेळी ते केरकर म्हणाले की, व्याघ्र क्षेत्र होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वन खात्याच्या उपवनपालाच्या म्हणण्यानुसार, १ हजार २७४ घरे व्याघ्र क्षेत्रात आहेत. आम्हाला आरटीआयखाली ही माहिती दिली गेली आहे. 

केरकर म्हणाले, की महाराष्ट्र व अन्यत्र जंगलात जनगणना होतेय, तशी गोव्यात वन खात्याने सुरू केलेली नाही. २०२२ पर्यंत गोव्याच्या जंगलात कॅमेरे होते, आताही आहेत. पण कॅमेऱ्यांमधून किती व कोणत्या प्रकारची जनावरे कोणत्या भागात टिपली गेली याची माहिती वन खाते कुणाला देतच नाही.

केरकर म्हणाले की, खरोखर व्यवस्थित सर्वेक्षण केले गेले तर घरांची ही संख्या आणखी खाली येईल. तथापि, १ हजार २७४ घरे एवढा आकडा जरी पकडला तर चार ते पाच हजार लोकवस्ती, असे गृहीत धरता येईल. यापैकी काही लोकांना व्याघ्घ्र क्षेत्राच्या बफर झोनमध्ये राहता येते.

काही लोकांना जर दुसरीकडे जाऊन रहायचे असेल तर सरकारला त्यांचे व्यवस्थित पुनर्वसन करावे लागेल. थेट व्याघ्र क्षेत्रात मात्र कायद्यानुसार कुणाला राहता येणार नाही. व्याघ्र क्षेत्र एकदा झाले की, गोवा राज्य म्हादई पाणी तंट्याच्या विषयात कर्नाटकविरुद्ध जिंकू शकेल. वाघ जगले तरच जंगल व पाण्याचे रक्षण होईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Tiger zone affects only 1274 homes: Rajendra Kerkar

Web Summary : Rajendra Kerkar says Goa's tiger zone benefits water, forests. Only 1274 homes are affected; relocation possible. Tiger zone helps Goa win Mahadayi water dispute against Karnataka.
टॅग्स :goaगोवाTigerवाघforestजंगल