कारची धडक बसून दुचाकीचालक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 18:02 IST2019-11-08T18:01:53+5:302019-11-08T18:02:20+5:30
गोव्यातील दक्षिण गोव्यातील वार्का येथे आज दुपारी महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत आल्टो कारने धडक दिल्याने एक दुचाकी चालक जागीच ठार झाला.

कारची धडक बसून दुचाकीचालक ठार
मडगाव - गोव्यातील दक्षिण गोव्यातील वार्का येथे आज दुपारी महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत आल्टो कारने धडक दिल्याने एक दुचाकी चालक जागीच ठार झाला. मारुती कुपुटगिनी असे मयताचे नाव आहे. मयत अंदाजे ४0 ते ४५ वयोगटातील असून, तो याच भागातील नोवानगाळ - वार्का येथील रहिवाशी आहे.महाराष्ट्र राज्याच्या नोंदणीकृत एमएच 0९ सीएम ५७७२ या आल्टो कारने स्पेलंडर मोटरसायकलला धडक दिली. कार चालक यशवंत गोपाल गुरव (२८) याच्यावर गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली असून तो महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हयातील आहे.
आपल्या बहिणीला पोहचविण्यासाठी तो आला होता. ओडली येथे तो जात होता. दुचाकीचालकाने अंतर्गंत रस्त्यावर जाण्यासाठी वळसा घातला असता, त्याला कारची धडक बसली. यात गंभीर जखमी होउन त्याला मरण आले. मागाहून हॉस्पिसियो इस्पितळात त्याला दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. भारतीय दंड संहितेच्या ३0४ (अ) कलमाखाली संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.