युवतीचे नग्न फोटो टाकले सोशल मीडियावर, गुन्हा दाखल

By वासुदेव.पागी | Updated: March 17, 2024 17:49 IST2024-03-17T17:49:34+5:302024-03-17T17:49:46+5:30

पणजी: युवतीची नग्न छायाचित्रे रेडिट, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साईटवर टाकून युवतीची बदनामी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ...

Nude photos of the young woman were posted on social media | युवतीचे नग्न फोटो टाकले सोशल मीडियावर, गुन्हा दाखल

युवतीचे नग्न फोटो टाकले सोशल मीडियावर, गुन्हा दाखल

पणजी: युवतीची नग्न छायाचित्रे रेडिट, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साईटवर टाकून युवतीची बदनामी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पणजी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र संशयिताचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला आहे. 

युवतीची नग्न छायाचित्रे रेडीटया सोशल मीडिया वेबसाईटवर टाकणाऱ्याने तसे करणार अशी धमकी देण्याचा संदेश Whatsapp वरून मुलीला दिला होता. त्यामुळे संशयिताचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला आहे. मोबाईल क्रमांकाच्या आधारावर संशयिताला पकडण्यासाठी पणजी पोलीस प्रयत्न करीत आहेत. तूर्त अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

संशयित युवतीकडे पैशांची मागणी करीत होता. ती मागणी मान्य न केल्यास फोटो रेडीटवर टाकले जातील तसेच Whatsapp ग्रुपवर टाकले जातील अशी धमकीही देण्यात आली होती. इन्स्टाग्रामवरही त्याने हे फोटो टाकले आहेत आणि काही Whatsapp ग्रुप्सवरही पोस्ट केल्याचा युवतीला संशय आहे. या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम ३५४ आणि ५०६ अंतर्गत तसेच आयटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात पणजी पोलीस संशयिताकडे पोहोचण्याचा शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Nude photos of the young woman were posted on social media