इंधन दरवाढ प्रकरणी महिला काँग्रेसचे तिरडी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 19:20 IST2020-07-01T19:20:31+5:302020-07-01T19:20:46+5:30
पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ हे उचित नाही आहे.

इंधन दरवाढ प्रकरणी महिला काँग्रेसचे तिरडी आंदोलन
मडगाव: देशात झालेल्या इंधन दरवाढ प्रकरणी गोवा प्रदेश महिला संघटनेने मडगाव येथील कदंब बस स्टँड जवळ निदर्शने करून दुचाकीची प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त केला. देशाचे राष्ट्रपती यांना दरवाढ मागे घेण्या संदर्भात जिल्हाधिकारी अजित रॉय यांना निवेदन सादर करण्यासंदर्भात त्यांच्याकडे सुपूर्द केले.
गोवा प्रदेश महिला संघटनेच्या अध्यक्ष प्रतिमा कुटीन्हो यांनी या वेळी बोलताना सांगितले की यावेळी जनता कोविड 19 वायरस या संक्रमणाचा सामना करीत आहे. अशा स्थितीतही पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ हे उचित नाही आहे. जनता बेकार व असाहाय झालेली आहे. आणि सरकार आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सरकार गरीब माणसाला आणखी गरीब आणि श्रीमंत माणसाला श्रीमंत करण्यात गुंतले आहे. एका भाजप नेत्याने सांगितलेल्या याचा परिणाम सामान्य जनतेवर होणार नाही या वक्तव्याचा ही कूतीनो हिने निषेड केला.या वेळी डॉलरच्या तुलनेत इंधनाची दरवाढ मोठी झाली आहे.
या पूर्वी गृह आधाराचे पैसे मिळत नसल्याने आम्ही लढा दिला आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला लागले. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आवाहन करताना या इंधनाचे दर ही खाली आणून दाखवावेत असे शेवटी सांगितले.