बाळाच्या खून प्रकरणी मातेकडून पोलिसांना तपासकामात असहकार्यच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 16:13 IST2024-01-12T16:11:31+5:302024-01-12T16:13:00+5:30
एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ बाळाचा झोपेतच मृत्यू झाल्याचा दावा करत असून पोलिसांना तपासकामात असहकार्य करत आहे.

बाळाच्या खून प्रकरणी मातेकडून पोलिसांना तपासकामात असहकार्यच
पणजी : केवळ ४ वर्षे वयाच्या पोटच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याचा आरोप असलेल्या एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ बाळाचा झोपेतच मृत्यू झाल्याचा दावा करत असून पोलिसांना तपासकामात असहकार्य करत आहे.
कांदोळी येथे हॉटेलच्या ज्या खोलीत घटना घडली तेथे पोलिसांबरोबर जाण्यास तिने नकार दिला. त्यामुळे पोलिसांना आता वेगळा मार्ग पत्करावा लागणार आहे.
ती सध्या सहा दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत आहे. तिला घटनास्थळी नेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. पती व्यंकट रमण हिच्याशी संबंध बिघडून घटस्फोटापर्यंत मामला पोहोचल्यावर आपल्या चार वर्षीय मुलावर राग काढताना तिने बाळाचा गळा घोटल्याचा आरोप आहे.
गोव्यातील कांदोळी येथील हॉटेलमधील एका खोलीत खुनाचा हा प्रकार घडला. मृतदेह बॅगमध्ये भरुन गोव्याहून बंगळूरला पळ काढत असताना गोवा पोलिसांनी सतर्क केल्यानंतर चित्रदुर्ग जिल्ह्यात तिला पोलिसांनी पकडले होते.