सिलिंडरबाबत चिंता नको: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जनता दरबारात समजून घेतल्या लोकांच्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:12 IST2026-03-16T07:12:12+5:302026-03-16T07:12:56+5:30

साखळीत जनता दरबारात शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकली.

no need to worry about cylinders said cm pramod sawant | सिलिंडरबाबत चिंता नको: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जनता दरबारात समजून घेतल्या लोकांच्या समस्या

सिलिंडरबाबत चिंता नको: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जनता दरबारात समजून घेतल्या लोकांच्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यात विधानसभा अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व्यस्त आहेत. शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुण्यात होते. त्या ठिकाणी त्यांना विशेष पदवी बहाल करण्यात आली. मध्यरात्री मुख्यमंत्री गोव्यात दाखल झाले. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांनी साखळीत जनता दरबारात शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकली.

लोकांनी गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक सिलिंडरबाबत अनेक शंका जनता दरबारात उपस्थित केल्या. घरगुती सिलिंडरबाबत कोणताही तुटवडा नाही. प्रत्येकाने बुकिंग केल्यानंतर घरपोच ते मिळतील, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

अफवांवर विश्वास ठेवू नका 

व्यस्त वेळातही आपला लोकांशी असलेला संपर्क कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री आवर्जून वेळ देत असल्याने लोकांची कामे तातडीने होण्यास व मदत होत पाठपुरावा ठेवण्यात असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. सध्या आखाती देशांतील युद्धामुळे राज्यात घरगुती गॅस सिलिंडराबाबत अकारण अफवा पिकवल्या जात असल्या, तरी सर्वांना सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. रितसर बुकिंग करून तो घरपोच देण्याची व्यवस्था असल्याने कुणीही चिंता करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 

Web Title : सिलिंडर की चिंता नहीं: मुख्यमंत्री सावंत ने सुनी जनता की बात

Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने नागरिकों को आश्वस्त किया कि गैस सिलिंडर की कोई कमी नहीं है। बुकिंग से होम डिलीवरी की गारंटी। उन्होंने लोगों से अंतरराष्ट्रीय संघर्षों से फैली अफवाहों पर ध्यान न देने का आग्रह किया और जनता दरबार के दौरान सार्वजनिक चिंताओं को तुरंत दूर करने की अपनी प्रतिबद्धता पर जोर दिया।

Web Title : No Cylinder Worries: CM Sawant Addresses Public Grievances

Web Summary : Chief Minister Pramod Sawant assures citizens no gas cylinder shortage exists. Booking guarantees home delivery. He urges people to ignore rumors fueled by international conflicts and emphasizes his commitment to addressing public concerns promptly during Janata Darbar.