शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

कुंकळ्ळीतील अग्निशमन दलाची गरज पुन्हा एकदा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 18:19 IST

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काही धोकादायक कारखाने असल्याने या भागात अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याची ओरड करुन कुंकळ्ळीवासियांचा घसा कोरडा पडला तरीही अजुन या भागात केंद्र सुरू झालेले नाही.

ठळक मुद्देकुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काही धोकादायक कारखाने असल्याने या भागात अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करणे अत्यावश्यक आहे.शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत जॉन फर्नांडीस यांच्या मालकीचा फायबर बोट बनवण्याचा कारखाना जळून खाक झाला. कुंकळ्ळीत अशी कुठलीही दुर्घटना घडल्यास आग विझविण्याचे बंब मडगाव अथवा कुडचडे येथून आणावे लागतात.

सुशांत कुंकळयेकर

कुंकळ्ळी - कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काही धोकादायक कारखाने असल्याने या भागात अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याची ओरड करुन कुंकळ्ळीवासियांचा घसा कोरडा पडला तरीही अजुन या भागात केंद्र सुरू झालेले नाही. शुक्रवारी या औद्योगिक वसाहतीत झालेल्या आगीच्या दुघर्टनेमुळे ही मागणी किती रास्त होती त्याचा प्रत्यय आला. या दुर्घटनेमुळे कुंकळ्ळीतील अग्निशमन दलाच्या केंद्राचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत जॉन फर्नांडीस यांच्या मालकीचा फायबर बोट बनवण्याचा कारखाना जळून खाक झाला. ही आग अन्य कारखान्यातही पसरण्याची भीती होती. मात्र सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग दुसरीकडे पसरू शकली नाही असे जरी असले तरी आग विझवण्याचे बंब वेळेवर न पोहचल्याने या कारखान्यातील झालेलं नुकसान मात्र ते थांबवू शकले नाहीत.

आगीची घटना घडल्यानंतर तब्बल अर्धा तासाने आगीचे बंब घटनास्थळी पोहचले. त्यामुळेच तत्परतेने आग आटोक्यात येऊ शकली नाही. यासंबंधी चिंता व्यक्त करताना कुंकळ्ळीचे नागरिक रेझन आल्मेदा म्हणाले, कुंकळ्ळीत अशी कुठलीही दुर्घटना घडल्यास आग विझविण्याचे बंब मडगाव अथवा कुडचडे येथून आणावे लागतात. ही दोन्ही केंद्रे कुंकळ्ळीपासून १८ कि.मी. अंतरावर असल्याने कितीही वेगाने ती हाकली तरी घटनास्थळी पोहचण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागतोच.

तीन वर्षापूर्वी याच औद्योगिक वसाहतीत ग्लोबल इस्पात या लोखंडी सळ्या बनवण्याच्या कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन ५ कामगारांना जळून मृत्यू आला होता. त्यावेळीही आपत्कालीन यंत्रणा उशीराच पोचली होती. त्यावेळीही अशी व्यवस्था कुंकळ्ळीच्या जवळच असावी अशी मागणी झाली होती अशी माहिती या औद्योगिक वसाहती जवळच राहणारे कमलाक्ष प्रभूगावकर यांनी दिली. प्रभूगावकर म्हणाले, वास्तविक या दुर्घटनेत किमान १० ते १५ कामगारांचा जीव जाण्याची शंका त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. मात्र अधिकृतरित्या ५ मृतांचीच नावे जाहीर करण्यात आली.

मागची कित्येक वर्षे आम्ही कुंकळ्ळकर अग्निशमन दलाची मागणी करतो आहोत. मात्र शासनाने या मागणीकडे गंभीरपणे लक्ष दिलेले नाही अशी प्रतिक्रिया रेझन आल्मेदा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मी स्वत:च मुख्यमंत्र्यांना ४ ते ५ वेळा यासंबंधी पत्रे पाठवली आहेत. मात्र प्रत्येकवेळी तुमच्या मागणीवर आम्ही लक्ष देऊ असे उत्तर देऊन आपली बोळवण केल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, वास्तविक ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी अग्निशमन दल असण्याची नितांत गरज आहे. शुक्रवारच्या घटनेने त्यावर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब केले आहे.औद्योगिक वसाहतीतील हायड्रंट चालेना

कुंकळ्ळीच्या औद्योगिक वसाहतीतील आग लागण्याची घटना घडली तर ती विझवण्यासाठी त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याच्या हायड्रंटची सोय केली आहे. मात्र हे हायड्रंट चालत नसल्याचे शुक्रवारच्या दुर्घटनेच्या वेळी दिसून आले. ही आग विझवण्यासाठी पाच बंब आणले गेले होते. मात्र एकदा बंबातील पाणी संपल्यावर ते पुन्हा भरण्यासाठी त्यांना जवळपासच्या नदीवर जाण्याची पाळी आली असे या घटनेचे साक्षीदार असलेले कमलाक्ष प्रभूगावकर यांनी सांगितले. वास्तविक हे हायड्रंट चालू अवस्थेत आहेत की नाहीत याची ठराविक कालावधीनंतर वसाहतीतील अधिकाऱ्यांनी पाहणी करायची गरज असल्याचे ते म्हणाले.गवतही कापले नाही

शुक्रवारी जी आगीची दुर्घटना घडली ती या भागातील रानटी गवताला (करडाला) आग लागल्यामुळेच घडल्याचे सांगण्यात येते. या औद्योगिक वसाहतीत कित्येक प्लॉट्स वापराशिवाय बंद आहेत. या प्लॉट्सची निगराणी कुणी करत नसल्याने तिथे रानटी गवत वाढले आहे. वास्तविक औद्योगिक वसाहतीतर्फे असे वाढलेले गवत कापून टाकण्यात येते. मात्र यंदा ही खबरदारी न घेतल्याने कित्येक प्लॉट्समध्ये असे गवत वाढलेले असून त्यामुळे संपूर्ण वसाहतच धोक्याच्या कक्षेत असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :fireआगgoaगोवा