कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; सापळा रचून रंगेहाथ पकडले
By काशिराम म्हांबरे | Updated: April 24, 2024 17:33 IST2024-04-24T17:33:04+5:302024-04-24T17:33:38+5:30
संशयित बोडकेवाडा परिसरातील एका रिसॉर्टजवळ अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती.

कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; सापळा रचून रंगेहाथ पकडले
काशिराम म्हांबरे ,म्हापसा : बोडकेवाडा कळंगुट येथे कळंगुट पोलिसांनी छापा मारून संजय झोहार ( वय २६. रा, कळंगुट ) या संशयिताने बेकायदेशीररित्या बाळगलेला ८० हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आज बुधवारी हा कारवाई करण्यात आली.
संशयित बोडकेवाडा परिसरातील एका रिसॉर्टजवळ अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करून सापळा रचण्यात आला होता.
ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना रचलेल्या सापळ्यात तो अडकल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. संशयित झोहार यानी या कारवाईत बाळगलेला ८ ग्राम वजनाचा तसेच उच्च प्रतीचा एमडीएमए हा अमंली पदार्थ जप्त करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. उपनिरीक्षक परेश सिनारी पुढील तपास करीत आहे.