कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; पोलिसांच्या कारवाईत आरोपी अटकेत

By काशिराम म्हांबरे | Updated: December 29, 2023 17:04 IST2023-12-29T17:03:01+5:302023-12-29T17:04:36+5:30

कळंगुट पोलिसांनी नायकावाडो परिसरात केली कारवाई.

Narcotics seized in Calangute in goa | कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; पोलिसांच्या कारवाईत आरोपी अटकेत

कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; पोलिसांच्या कारवाईत आरोपी अटकेत

काशिराम म्हांबरे, म्हापसा: कळंगुट पोलिसांनी नायकावाडो परिसरात केलेल्या कारवाईत  मोस्ताफिजून मंडल ( वय ३५, पश्चीम बंगाल) या संशयिताकडून अवैधरित्या बाळगलेला ९४ हजार रुपये किमतीचा तसेच ९४० ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

काल शुक्रवारी रात्री ११.३० च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती निरीक्षक परेश नाईक यांनी दिली. संशयित अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध होताच त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आलेला. ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना मंडल याला अटक करण्यात आली. काही दिवसापूर्वीच तो गोव्यात दाखल झाला होता. अधिक चौकशीसाठी त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून पुढील तपास कार्य उपनिरीक्षक राजाराम बागकर यांच्या वतिने सुरु करण्यात आले आहे.

Web Title: Narcotics seized in Calangute in goa