शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मुंबई-गोवा पदयात्रा, अनेकांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 18:28 IST

अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘दि फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि स्नेहबंधन या संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेली मुंबई-गोवा पदयात्रा मंगळवारी पनवेल येथे पोचली. येत्या १५ एप्रिल रोजी मडगांव येथे या पदयात्रेची सांगता होणार आहे. 

पणजी : अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘दि फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि स्नेहबंधन या संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेली मुंबई-गोवा पदयात्रा मंगळवारी पनवेल येथे पोचली. येत्या १५ एप्रिल रोजी मडगांव येथे या पदयात्रेची सांगता होणार आहे. 

पदयात्रेचे गोवा समन्वयक एम. एस. राव यांनी दिलेल्या माहितीनुसार परेल येथील केईएम रुग्णालयाजवळ २३ रोजी या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. अवयवदान कार्यकर्ता सुनील देशपांडे यांच्यासह १५ ते २0 ज्येष्ठ नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले असून वाटेत त्या त्या ठिकाणचे डॉक्टर्स अवयवदानाबाबत लोकांना मार्गदर्शन करतील. या मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा व ग्रामीण रुग्णालये, खाजगी रुग्णालये यांना सदर उपक्रमास सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. 

मुंबई-गोवा मार्गावरील किनारपट्टीतील गावांमध्येही ही पदयात्रा जाणार असून एकूण ८६0 किलोमिटरचा पायी प्रवास करणार आहे. एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या किंवा शाळेच्या आवारात लोकांना सीडी, व्हिडियो चित्रफिती दाखवून अवयवदानाबाबत जागृती केली जाईल. इंडियन मेडिकल असोसिएशन, केईएम इस्पितळाचे डीन, ‘रोटो’ आदी संघटनांनी पदयात्रेला पाठिंबा दिलेला आहे. 

राव म्हणाले की, लोकांना केवळ मरणोत्तर नेत्रदानाबद्दलच माहीत आहे. हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड एवढेच नव्हे तर त्वचाही दान करता येते याबाबत तेवढी जागृती लोकांमध्ये झालेली नाही. ऐरोलीसारख्या ठिकाणी डॉ. केशवानी यांच्या इस्पितळात अनेक रुग्ण येतात जे आगित होरपळल्याने गंभीर जखमी झालेले असतात. अशा रुग्णांना त्त्वचेची गरज असते. डोळे व त्त्वचा दोन ते तीन वर्षे प्रयोगशाळेमध्ये संवर्धित करुन ठेवता येते परंतु मूत्रपिंड, हृदय यांच्या रोपणाबाबत मर्यादा आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही तासांच्या आतच ते काढून गरजू रुग्णावर रोपण करावे लागते. मध्यंतरी चेन्नई येथून हृदय आणून मुंबईतील एका गरजू रुग्णावर त्याचे यशस्वीरित्या रोपण करण्यात आले त्यामुळे त्याला जीवदान मिळाले. 

राव म्हणाले की, गोव्यात दरवर्षी सुमारे ३ हजार रस्ता अपघात घडतात. गेल्या वर्षी ३८0 जण अपघातात ठार झाले. अशा व्यक्तींच्या अवयवांचे गरुजू रुग्णांवर रोपण झाल्यास गरजूंचे प्राण वाचतील. अवयवदानाबाबत लोकांमध्ये अनेक चुकीचे समज आहेत. मात्र ७0 वर्षे वयापर्यंत कोणीही व्यक्ती अवयवदान करु शकते. 

गोव्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर काही विषय आपण ठेवणार आहे, असे राव यांनी सांगितले. गोव्यात पदयात्रेच्यावेळी मणिपाल इस्पितळाचे तसेच गोमेकॉचे डॉक्टर्सही लोकांना अवयवदानाबाबत मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :goaगोवा