कळंगुट येथे मोबाईल चोरट्यांना अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: September 15, 2023 15:31 IST2023-09-15T15:30:12+5:302023-09-15T15:31:51+5:30

चोरीला गेलेल्या फोन सोबत आणखिन काही मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.

mobile thieves arrested in calangute goa | कळंगुट येथे मोबाईल चोरट्यांना अटक

कळंगुट येथे मोबाईल चोरट्यांना अटक

काशीराम म्हांबरे, म्हापसा: कळंगुट येथील फिश अ‍ॅण्ड करी या रेस्टॉरंटातून मोबाईल फोनची चोरी केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. चोरीला गेलेल्या फोन सोबत आणखिन काही मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.

निरीक्षक परेश नाईक  यांनी दिलेल्या माहितीनुसार या संबंधी केशव कांदुरकर ( रा. कळंगुट, मूळ कोल्हापूर) यांनी या संबंधी तक्रार दाखल केली होती.  त्यात त्यांनी ७९ हजार रुपये किमतीचे चार फोन चोरीला गेल्याचे म्हटले होते.

तपासा अंती  पोलिसांनी रिझवान मुल्ला ( पश्चीम बंगाल ) तसेच मोसायरुल मुल्ला ( पश्चीम बंगाल) या संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून दिड लाख रुपये किमतीचे८ फोन सापडले. त्यात चोरलेल्या मोबाईल फोनचाही समावेश होता. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार संशयित त्याच हॉटेलात कामाला होते. हवालदार सतीश सावंत यांच्या मार्फत तपास कार्य सुरु आहे.

Web Title: mobile thieves arrested in calangute goa