आमदार चंद्रकांत शेट्ये यांचे कार्य कौतुकास्पद: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2024 08:06 IST2024-07-23T08:06:02+5:302024-07-23T08:06:58+5:30

वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

mla chandrakant shetye work commendable cm pramod sawant praised | आमदार चंद्रकांत शेट्ये यांचे कार्य कौतुकास्पद: मुख्यमंत्री

आमदार चंद्रकांत शेट्ये यांचे कार्य कौतुकास्पद: मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: आमदार डॉ. चंद्रकांत विकासाचा ध्यास घेऊन कामाला चालना देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. अनेक काम शहरात व ग्रामीण भागात सुरू आहेत. डॉ. शेट्ये दूरदृष्टीने विचार करून नियोजन करतात. त्यांनी दिलेले पाच वर्षांतील सर्व प्रकल्प पूर्ण करणार. या पुढेही त्यांना जनतेने खंबीरपणे साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आमदार डॉ. शेट्ये यांना वाढदिवस सोमवारी उत्साहात झाला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सायंकाळी डिचोली येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून शेट्ये यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेट्ये यांना केक भरवला. अनेक मंत्री, आमदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डॉक्टरांचे चाहते मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. शेट्ये यांच्या कामाचे कौतुक केले. शेट्ये यांनी अनेक विकास कामांचे प्रस्ताव दिले आहेत. ते सर्व मंजुर केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

डिचोली विकास हे माझे स्वप्न असून आदर्श मतदार संघ व्हावा यासाठी अविरत प्रयत्न करत राहणार असल्याचे आमदार डॉ, शेट्ये यांनी सांगितले.

 

Web Title: mla chandrakant shetye work commendable cm pramod sawant praised