गोव्यात ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत, संशयितावर गुन्हा नोंद

By सूरज.नाईकपवार | Updated: June 2, 2024 10:48 IST2024-06-02T10:46:28+5:302024-06-02T10:48:31+5:30

ड्युटीवरील वाहतुक पोलिस अधिकाऱ्याशी हुज्जत घालून अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी  गोव्यातील सासष्टीतल्या फातोर्डा पोलिसांनी एकावर गुन्हा नोंद केला आहे.

misbehave with police officer on duty in Goa, case registered against suspect | गोव्यात ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत, संशयितावर गुन्हा नोंद

गोव्यात ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत, संशयितावर गुन्हा नोंद

मडगाव - ड्युटीवरील वाहतुक पोलिस अधिकाऱ्याशी हुज्जत घालून अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी  गोव्यातील सासष्टीतल्या फातोर्डा पोलिसांनी एकावर गुन्हा नोंद केला आहे. अफ्रान अझिझ शेख (२५) असे संशयिताचे नाव आहे. मडगाव वाहतुक पोलिस निरीक्षक संजीव दळवी हे तक्रारदार आहेत. संशयितावर पोलिसांनी भादंसंच्या २९१,५०४,३५३१८६ व २६५ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. खेडेकर पुढील तपास करीत आहेत.

शनिवार  १ जुन रोजी दळवी हे आपल्या अन्य पोलिस स्टाफसह फातोर्डा जंक्शनवर ड्युटी करीत असताना, अफ्रान तेथे वादविवाद करीत असल्याचे त्यांना आढळून आले, त्यांनी त्वरीत त्याला शांत राहण्यास सांगितले असता, संशयित दळवी यांनी अर्वाच्य भाषा वापरली व नंतर घटनास्थळाहून पळ काढला. मागाहून यासंबधी पोलिसांत रितसर तक्रार नोंदविण्यात आली.

Web Title: misbehave with police officer on duty in Goa, case registered against suspect