तिरुमल्ला तिरुपती बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू; आठवड्यात अहवाल मिळेल: सुभाष शिरोडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:42 IST2026-02-07T11:42:11+5:302026-02-07T11:42:29+5:30

तिरुमल्ला तिरुपती कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष गुरुमीत सिंग तसेच बँकेच्या व्यवस्थापकांनी काल शुक्रवारी मंत्री सुभाष शिरोडकर यांची भेट घेतली.

minister subhash shirodkar said verification of tirumalla tirupati bank documents begins a report to be received in a week | तिरुमल्ला तिरुपती बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू; आठवड्यात अहवाल मिळेल: सुभाष शिरोडकर

तिरुमल्ला तिरुपती बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू; आठवड्यात अहवाल मिळेल: सुभाष शिरोडकर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तिरुमल्ला तिरुपती कोऑपरेटिव्ह बँकेने सादर केलेल्या कागदपत्रांची सध्या सहकार निबंधकांकडून पडताळणी सुरू असून, पुढील आठवड्यात त्याबाबतचा सविस्तर अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

तिरुमल्ला तिरुपती कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष गुरुमीत सिंग तसेच बँकेच्या व्यवस्थापकांनी काल शुक्रवारी मंत्री सुभाष शिरोडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्री शिरोडकर यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, तिरुमल्ला तिरुपती कोऑपरेटिव्ह बँकेने मागील काही वर्षापासून ऑडिट अहवाल सादर केलेला नाही. बँकेने दिलेली कर्जे, जमा ठेवी, मालमत्ता तसेच इतर आर्थिक माहिती सादर करणे अपेक्षित होते. मात्र वारंवार विचारणा करूनही ही माहिती सादर न केल्याने बँकेच्या काही शाखांना देण्यात आलेली एनओसी मागे घेण्यात आली. आज बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकांनी भेट घेऊन या विषयावर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले.

नोटीस जारी केल्यानंतर बँकेकडून काही कागदपत्रे सादर करण्यात आली असून त्यांची सहकार निबंधकांकडून सखोल पडताळणी सुरू आहे. पुढील आठवड्यात, म्हणजेच बुधवार किंवा गुरुवारी, त्यासंदर्भातील अहवाल प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. संबंधित बँकेवर केंद्रीय सहकार निबंधकांचे नियम लागू होत असले, तरी गोव्यात बँकेच्या शाखा कार्यरत असल्याने येथील सहकार निबंधकांकडेही ऑडिट अहवाल सादर करणे आवश्यक आहे, असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांनी घाबरू नये : सिंग

तिरुमल्ला तिरुपती कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष गुरुमीत सिंग यांनी सांगितले, बँकेसंबंधी काही कागदपत्रे आम्ही सादर केली असून, काही कागदपत्रे अद्याप सादर करायची आहेत. त्यासाठी आम्ही सरकारकडे मुदतवाढ मागितली आहे. ग्राहकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. आमच्या सर्व शाखा नियमितपणे कार्यरत आहेत. आमची बैंक विश्वासार्हतेवर आधारित असून सर्व व्यवहार पारदर्शक आहेत. तांत्रिक कारणांमुळे ऑडिटचा विषय प्रलंबित राहिला असावा. ज्या शाखांची एनओसी सहकार निबंधकांनी मागे घेतली आहे, ती पुन्हा मिळेल.
 

Web Title : तिरुपति बैंक दस्तावेजों की जांच जारी; रिपोर्ट अगले सप्ताह अपेक्षित।

Web Summary : तिरुपति सहकारी बैंक के दस्तावेजों की जांच जारी है। रजिस्ट्रार सहकारी समितियां सत्यापन कर रहे हैं; मंत्री शिरोडकर का कहना है कि रिपोर्ट अगले सप्ताह अपेक्षित है। बैंक ने शेष दस्तावेज जमा करने के लिए समय मांगा है। बैंक अध्यक्ष ने ग्राहकों को शांत रहने का आश्वासन दिया।

Web Title : Tirumalla Tirupati Bank documents verification ongoing; report expected next week.

Web Summary : Tirumalla Tirupati Cooperative Bank's submitted documents are under scrutiny. Registrar of Cooperatives is verifying; report expected next week, says Minister Shirodkar. Bank seeks time to submit remaining documents. Customers should not panic, assures bank chairman.