मध्यरात्री महिलांच्या खोलीत शिरतोय एक विकृत, ताळगावात लोक दहशतीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 22:01 IST2018-09-06T22:01:41+5:302018-09-06T22:01:49+5:30

ताळगाव टेकडीवरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांत सध्या एका काळ्या मानवी आकृतीची धास्ती भरली आहे.

In a midnight woman lying in a women's room, people in Talegaon scared | मध्यरात्री महिलांच्या खोलीत शिरतोय एक विकृत, ताळगावात लोक दहशतीखाली

मध्यरात्री महिलांच्या खोलीत शिरतोय एक विकृत, ताळगावात लोक दहशतीखाली

पणजी: ताळगाव टेकडीवरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांत सध्या एका काळ्या मानवी आकृतीची धास्ती भरली असून हा माणूस मध्यरात्री भल्या पहाटे लोक साखर झोपेत असताना महिला असलेल्या घरात नग्नच शिरतो आणि महिलांची अंत:वस्त्रे घेऊन पळतो. पोलिसांनाही अद्याप संशयिताचा पत्ता न लागल्यामुळे येथील लोक दहशतीखाली आहेत.

या प्रकरणात पणजी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार हा माणूस रात्री खूप उशिरा ३.३०च्या सुमारास ताळगाव टेकडीवर असलेल्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये शिरतो. खिडकीच्या काचा फोडून तो आत शिरतो. त्याच्या अंगावर केवळ एक अंडरवियर शिवाय काहीच नसते, तसेच अंगाला कसले तरी तेल सारवून येतो. महिला झोपलेल्या असल्यात त्यांना पाहत राहतो. तसेच घरातील महिलांची अंत्यवस्त्रे पळवून नेतो. इतर मौल्यवान वस्तुला हात लावत नाही, परंतु काही किरकोळ रक्कमही लांबवितो. ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्याने पणजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे वर्णन केलेले आहे.

अडवपाल रेसिडेन्सीतील फ्लॅटमध्ये हा प्रकार एकदा नव्हे तर ब-याच वेळा घडला आहे. दोन वेळा त्याला घरातील लोकांनी पाहिले होते, परंतु अत्यंत शिताफीने आल्या मार्गे पुन्हा बाहेर पडून तो पसार झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलीस तक्रारीही करण्यात आल्या होत्या, परंतु चोरी न झाल्यामुळे त्या नोंदल्या गेल्या नाहीत. या इमारतीत राहणा-या सर्व लोकांनी बुधवारी सामूहिकरित्या तक्रार नोंदविल्यानंतर गुरुवारी ती नोंदविण्यात आली. अद्याप पोलिसांना संशयिताच्या हाता पायांचे ठसे मिळाले आहेत, परंतु तपासात फारशी प्रगती झालेली नाही.

सीटीटीव्ही फुटेज गायब?
या इमारतीच्या ब्लॉकला सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आलेले नाहीत, परंतु शेजारच्या इमारतीला कॅमरे आहेत. संशयित ज्या मुख्य फाटकातून आत शिरण्याची सर्वाधिक शक्यता आहे त्या ठिकाणीही कॅमरा लावण्यात आलेला आहे. परंतु २ सप्टेंबर रोजी ही घटना घडली त्याच रात्रीची फुटेज गायब झाल्याचीही अफवा गुरूवारी संध्याकाळी होती. या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: In a midnight woman lying in a women's room, people in Talegaon scared