शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

म्हादई प्रश्नी स्थगन प्रस्ताव फेटाळला; विरोधकांची सभागृहात हातात फलक झळकावून घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 9:16 PM

म्हादईचे पाणी कर्नाटक वळवू पहात असल्याने विरोधक संतप्त बनले आहेत. 

पणजी: गोवा विधानसभेत म्हादई नदीच्या प्रश्नावर विरोधी काँग्रेससहगोवा फॉरवर्ड, मगोप आमदारांनी संयुक्तपणे विधानसभेत आणलेला स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळल्याने विरोधकांनी सभागृहात हातात फलक झळकावून म्हादई बचावसाठी जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळातच सभापतींनी जीएसटी विधेयक मतदानास टाकून संमत करुन घेतले. म्हादईचे पाणी कर्नाटक वळवू पहात असल्याने विरोधक संतप्त बनले आहेत. 

विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केलेला विषय ही नुकतीच घडलेली घटना नव्हे. अन्य संसदीय माध्यमातून हा प्रश्न कालांतराने उपस्थित करता येईल. लक्ष्यवेधी सूचना, शून्य प्रहर यासारखा मार्ग त्यासाठी आहे, असे सभापती राजेश पाटणेकर हा स्थगन प्रस्ताव फेटाळताना म्हणाले. आमदार विजय सरदेसाई तसेच अन्य ९ आमदारांनी स्थगन प्रस्तावाची नोटिस दिली होती. 

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी स्थगन प्रस्तावावर चर्चा व्हायला हवी, हा राज्याच्यादृष्टिने महत्त्वाचा विषय आहे, असे नमूद केले. जीएसटी विधेयकापेक्षा म्हादईचा विषय गंभीर असल्याने सभागृहात हा प्रस्ताव चर्चेत घ्यायलाच हवा असा आग्रह गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी धरला. सभापती काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. प्रस्ताव फेटाळण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर करताच विरोधकांनी म्हादई समर्थनार्थ हातात फलक झळकावून जोरदार घोषणाबाजी केली. ‘आमची म्हादय आमका जाय’,‘दिवचें ना रें दिवचें ना, आमची म्हादय दिवचें ना’ अशा घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमांव व अपक्ष आमदार प्रसाद गांवकर हे सरकारच्या बाजूने राहिले. विरोधक घोषणाबाजी करत होते तेव्हा दोघेही आसनावर बसून होते.                      राज्यपालांच्या विधानावर सरकार खुलासा का करत नाही? : सरदेसाई

हरकतीचा मुद्दा उपस्थित करुन आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, ‘स्थगन प्रस्तावासाठी आवश्यक तिन्ही गोष्टींची पूर्तता आम्ही केली होती. विधानसभा कामकाज नियम ६८ नुसार स्थगन प्रस्ताव आणण्याची मुभा आहे आणि नियम ७१ नुसार सभापतींनी तो दाखल करुन घ्यायला हवा.’

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हादईच्या बाबतीत केंद्राकडून गोव्याची फसवणूक झाली असल्याचे जे विधान केले आहे त्यावर सरकार खुलासा का करत नाही, असा सवाल केला. मुख्यमंत्री म्हादई आपल्या मातेपेक्षाही श्रेष्ठ असल्याचे जे विधान वेळोवेळी करतात त्याचे स्मरणही सरदेसार्इंनी करुन दिले. 

सरदेसाईंच्या या विधानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई आपल्या मातेपेक्षाही श्रेष्ठ असल्याचा पुनरुच्चार केला. म्हादई वाचविण्यासाठी आवश्यक ते सर्व काही सरकार करणार आहे, असे सावंत म्हणाले. हे अधिवेशन खास केंद्राने संमत केलेल्या दुरुस्ती विधेयकांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी बोलावण्यात आले होते त्यामुळे अन्य विषय चर्चेला घेता येणार नाहीत, असे सभापतींनी स्पष्ट केले.       एससी, एसटी राखीवता मुदतवाढ दुरुस्तीवर मतैक्याने शिक्कामोर्तब 

सभागृहात हा गोंधळ होण्याआधी केंद्राने अनुसूचित जाती, जमातींच्या राखीवतेत आणखी १0 वर्षांनी वाढ करणारे जे दुरुस्ती विधेयक संमत केले आहे त्यावर मतैक्याने शिक्कामोर्तब करण्यात आले. विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोप आमदारांनीही घटनात्मक दुरुस्तीच्या विधेयकाला संमती दिली. या विधेयकावर पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी सभागृहात बोलायचे होते परंतु सभापतींनी त्यांना अनुमती दिली नाही. गोवा जीएसटी विधेयक गोंधळातच संमत केल्यानंतर सभापतींनी ३ फेब्रुवारीपर्यंत विधानसभा कामकाज तहकूब केले. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाcongressकाँग्रेस