शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सर्व विरोधी आमदारांची 16 रोजी बैठक, पर्रीकरांकडून कवळेकर यांना ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 7:44 PM

पणजी : विधानसभा मतदारसंघांतील विकासकामे आणि त्या कामांसाठी निधी देणे या विषयाबाबत सरकारने आमदारांमध्ये भेदभाव करू नये, अशी मागणी घेऊन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली.

पणजी : विधानसभा मतदारसंघांतील विकासकामे आणि त्या कामांसाठी निधी देणे या विषयाबाबत सरकारने आमदारांमध्ये भेदभाव करू नये, अशी मागणी घेऊन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यानुसार येत्या शनिवारी 16 रोजी सर्व सोळाही काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. अशा प्रकारची विरोधी आमदारांची बैठक मुख्यमंत्री प्रथमच घेणार आहेत.मुख्यमंत्र्यांनी गेल्या पंधरवड्यात सर्व सत्ताधारी पक्षांच्या आमदारांची बैठक घेतली होती. भाजपासह मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदार व मंत्र्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी सत्ताधा-यांच्या ताब्यातील मतदारसंघात प्रत्येकी पंचवीस कोटी रुपयांचा खर्च करण्याची ग्वाही दिली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे सत्ताधा-यांच्या मतदारसंघांमध्ये जलदगतीने व्हावीत या हेतूने मुख्यमंत्र्यांनी ती बैठक घेतली होती. त्यानंतर काँग्रेसचे काही आमदार नाराज झाले. सरकार विकासकामांबाबत आमच्या मतदारसंघांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका आमदार आलेक्स रेजिनाल्ड व इतरांनी केली होती.काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या अपेक्षेनुसार नेते कवळेकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेसच्या आमदारांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघातही विकासकामे जलदगतीने होणे गरजेचे आहे व त्यासाठी निधी देखील हवा आहे, असा मुद्दा कवळेकर यांनी मांडला. पर्रीकर यांनी या मुद्द्याची दखल घेऊन आपण येत्या 16 रोजीच बैठक बोलवत असल्याचे जाहीर केले. बैठकीची वेळही मुख्यमंत्र्यांनी निश्चित केली व आपण विकासकामांबाबत भेदभाव करत नाही, असे कवळेकर यांना सांगितले.दरम्यान, गोवा विधानसभेच्या चार दिवसांच्या अधिवेशनास येत्या 13 रोजी आरंभ होत आहे. त्यामुळे 11 रोजी सायंकाळी चार वाजता काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. वास्कोतील कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, ग्रामसभांवर मर्यादा घालण्याचा सरकारचा प्रयत्न, काही विकास प्रकल्पांचे रखडलेले काम वगैरे विविध विषयांवर विधानसभेत आवाज उठविण्याचे काँग्रेसच्या काही आमदारांनी ठरवले आहे. येत्या 11 रोजी आमदारांच्या बैठकीत याविषयी चर्चा होईल व विधानसभा सभागृहातील विरोधकांचे व्यवस्थापन ठरविले जाईल, असे काही आमदारांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर