त्या डॉक्टराच्या समर्थनात डॉक्टरमंडळी व प्रतिष्ठीत नागरिक एकटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 18:31 IST2023-08-21T18:31:16+5:302023-08-21T18:31:33+5:30

डॉक्टराची प्रतिमा मलिन करण्यासाठी सारा डाव असल्याचा आरोप

Medical community and eminent citizens united in support of that doctor: Alleged conspiracy to tarnish doctor's image | त्या डॉक्टराच्या समर्थनात डॉक्टरमंडळी व प्रतिष्ठीत नागरिक एकटवले

त्या डॉक्टराच्या समर्थनात डॉक्टरमंडळी व प्रतिष्ठीत नागरिक एकटवले

मडगाव: विनयभंग प्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेल्या डॉ. प्रकाश अवदी यांच्या समर्थनात सोमवारी येथील डॉक्टर व प्रतिष्ठीत नागरिक एकत्र आले. मडगाव विभागाचे पोलिस उपअधिक्षक संतोष देसाई यांची भेट घेउन, डॉक्टरावरील नोंदविलेली पोलिस तक्रार ही त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी केलेली असल्याचा आरोपही यावेळी केला. त्याच प्रमाणे हे प्रकरण मिटविण्यासाठी पैशाची मागणी करणारी घटना घडली. मात्र डॉक्टर व त्याची घरची मंडळी त्यास बधली नाही. त्यात दोषी असलेल्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. डॉ. अवदी हे गेली ५० वर्षे वैदयकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. एक अत्यंत हुशार व लोकांना मदतीसाठी नेहमीच पावणारे डॉक्टर अशी त्यांची ओळख आहे, त्यांच्याविरोधात खोटा आरोप केला जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले

क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आलेल्या एका सव्वीस वर्षीय युवतीने डॉ. अवदी यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार मडगाव पोलिस ठाण्यात नोंदविली होती. पोलिसांनी त्यांच्याविरोधात भादंसंच्या ३५४ (अ) कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. इंडियन मेडिकल असोसिएशन मडगाव शाखेच्या अध्यक्ष डॉ. बबिता आंगले प्रभूदेसाई यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टर व नागरिकांनी उपअधिक्षक देसाई यांची भेट घेउन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी डॉ. अवदी हेही हजर होते.

नोंद झालेला गुन्हयाची चौकशी सदया प्राथमिक स्तरावर असल्याचे देसाई यांनी सांगितले. डॉक्टराला क्विनिक बंद करण्यास सांगणाऱ्या उपनिरीक्षकाची आम्ही चौकशी करु, डॉक्टराने आपले क्लिनिक सुरु ठेवावे, पोलिस संरक्षणही देउ असेही देसाई यांनी सांगितले. विनयंभग तक्राराचा तपास अधिकारी बदलू, दुसऱ्या उपनिरीक्षकाकडे विशेषता महिला अधिकाऱ्याकडे हे प्रकरण देउ असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. खंडणी मागण्यासाठी आलेल्यावर पोलिसांत तक्रार करावी, त्याची दखल घेउन पोलिस तपास करेल अशी ग्वाहीही देसाई यांनी यावेळी दिली.

मागाहून पत्रकारांशी बोलतान, ज्या पोलिस उपनिरीक्षकाच्या वर्तनाबाबत तक्रारदाराचा आक्षेप आहे त्याच्याविरुध्द चौकशी केली जाईल असे उपअधिक्षक देसाई यांनी सांगितले.

Web Title: Medical community and eminent citizens united in support of that doctor: Alleged conspiracy to tarnish doctor's image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा