शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

गोव्यात नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 11:55 AM

गोव्यातील काही नद्यांचे प्रवाह हे प्रदूषित झाले असल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आढळून आले आहे.

- सदगुरू पाटीलपणजी- गोव्यातील काही नद्यांचे प्रवाह हे प्रदूषित झाले असल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आढळून आले आहे. मंडळाने ही गोष्ट सरकारचे जलसंसाधन खाते, आरोग्य खाते तसेच काही ग्रामपंचायती व पालिकांच्या नजरेस आणून दिली आहे. प्रदूषित नद्यांच्या क्षेत्रत किंवा अशा नद्यांच्या किनारी भागांत येणाऱ्या गावांमध्ये विविध प्रकारची उपाययोजना प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य खाते व जलसंसाधन खात्याने मिळून सूचवली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी, अस्नोडा, डिचोली, शापोरा, वाळवंटी, साळ, खांडेपार व म्हापसा या आठ नद्यांमधील पाण्यातील प्रदूषणाच्या प्रमाणाचा अभ्यास केला आहे. सर्वच नद्या प्रदूषित झालेल्या नाहीत पण काही नद्या काही ठराविक भागांमध्ये प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे. नॅशनल वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग कार्यक्रमाखाली गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ गोव्यातील नद्यांचा 49 ठिकाणी नद्यांतील पाण्याच्या दर्जावर देखरेख ठेवत आहे. या शिवाय राष्ट्रीय नदी संवर्धन कार्यक्रमाखाली तीन ठिकाणी पाण्याचा दर्जा तपासला जातो. पाण्याचे नमूने घेऊन त्याचा अभ्यास केला जातो. या नद्यांच्या आधारे गोव्यातील पाणी पुरवठा व्यवस्था चालते. पाणी प्रक्रिया प्रकल्प चालतात. औद्योगिक वसाहतींमध्ये जे जलस्त्रोत आहेत, त्यांचाही दर्जा तपासला जातो. 

नद्यांचे यापुढील प्रदूषण रोखण्यासाठी शहरी भागांना मलनिसारण व्यवस्था पुरवावी असे प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंसाधन खाते व आरोग्य खात्याने मिळून ठरवले आहे. म्हापसा, पर्वरी, फोंडा, न्हावेली वगैरे भागातील मलनिसारणविषयक प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण करायला हवेत असेही या खात्यांना अपेक्षित आहे. ज्या ग्रामपंचायती नद्यांच्या किनारी भागांमध्ये येतात त्यांना सीवेज सकर टँकर्स पुरवावेत असेही यापूर्वी ठरले आहे. काही पंचायतींमध्ये प्राधान्याने सार्वजनिक शौचालये पुरवावीत असेही ठरले. काही लोक आपल्या घरांचे, हॉटेलांचे, रेस्टॉरंटचे सांडपाणी नद्यांमध्ये सोडतात व त्यामुळेही प्रदूषण होते. काही लोक नद्यांमध्ये नेऊन कचरा टाकतात. आरोग्य खात्याने अशा लोकांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या व त्यांची उत्तरेही आली. मात्र त्यानंतर मोठीशी पाऊले सरकारी पातळीवरून उचलली गेली नाहीत.

माशेल ते वळवई, अस्नोडा ते शिरसई, डिचोली ते कुडचिरे, पेडणो ते मोरजी, फोंडा ते ओपा, म्हापसा ते बिठ्ठोणा, खारेबांद ते मोबोर, वाळवंटी,साखळी-डिचोली ते पर्ये अशा पट्टय़ातील नद्यांतील पाण्यावर देखरेख ठेऊन प्रदूषण तपासले जात आहे. 

टॅग्स :goaगोवाpollutionप्रदूषण