मायकल लोबो यांना लवकरच चांगले दिवस : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:59 IST2025-06-19T10:58:59+5:302025-06-19T10:59:43+5:30

यावेळी आमदार डिलायला लोबो उपस्थित होत्या.

may michael lobo have better days soon said cm pramod sawant | मायकल लोबो यांना लवकरच चांगले दिवस : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मायकल लोबो यांना लवकरच चांगले दिवस : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना लवकरच चांगले उज्ज्वल दिवस येतील. भाजपत त्यांना अत्यंत चांगले भवितव्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. लोबो यांचा वाढदिवस त्यांच्या पर्रा येथील निवासस्थानी साजरा झाला. यावेळी त्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार डिलायला लोबो उपस्थित होत्या.

ते म्हणाले, लोबो हे सामान्य लोकांचे नेते आहेत. लोकांशी निवडीत विविध विषयांवर ते आवाज उठवतात. विधानसभेतसुद्धा त्यांचे प्रश्न मांडतात. आपण आणि लोबो एकाचवेळी आमदार म्हणून निवडून आलो. आपण सभापती झालो तर ते उपसभापती झाले. पक्षात त्यांना चांगले भवितव्य आहे. भाजपत पुन्हा प्रवेश केल्यापासून लोबो सक्षमपणे आपल्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य अजून उज्ज्वल व्हावे. लोकांनी कायम लोबो यांच्या पाठीशी राहावे.

दरम्यान, लोबो यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हितचिंतक, समर्थक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक नेते, मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, गोवा फॉरवर्डचे प्रमुख, आमदार विजय सरदेसाई, माजी आमदार ग्लेन टिकलो, आमदार दाजी साळकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार केदार नाईक, विविध पंचायतींचे सरपंच, पंच सदस्य आदींनी उपस्थिती लावून लोबो यांना शुभेच्छा दिल्या.
 

Web Title: may michael lobo have better days soon said cm pramod sawant