मटका किंगची 6 तास चौकशी, पप्पू सावला क्राईम ब्रँचसमोर हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 09:13 IST2018-09-06T08:49:35+5:302018-09-06T09:13:22+5:30
मटका किंग प्रकाश सावला ऊर्फ पप्पू सावला याची क्राईम ब्रँचने गुरुवारी 6 तास चौकशी केली.

मटका किंगची 6 तास चौकशी, पप्पू सावला क्राईम ब्रँचसमोर हजर
पणजी - मटका किंग प्रकाश सावला ऊर्फ पप्पू सावला याची क्राईम ब्रँचने गुरुवारी 6 तास चौकशी केली. सावलासारख्या मोठ्या मटगा किंगची पोलीस चौकशी करण्याची ही पहिलीच घटना आहे.
पप्पू सावला हे मटका जुगार जगतातील फार मोठे नाव असून महाराष्ट्र पोलिसांनी त्याला काही वर्षांपूर्वी मटका प्रकरणात अटक केली होती. गोव्यात काही दिवसांपूर्वी कांदळी येथे क्राईम ब्रँचने छापा टाकून 29 संशयितांना अटक केली होती. मटका जुगाराची सूत्रे हाताळणाऱ्या मोठ्या एजंटला त्या छाप्यात पकडले होते. त्यामुळे एक दिवस मुंबई मुख्य मटका बाजार बंदही राहिला होता. परंतु मुख्य सूत्रधार असलेला पप्पू सावला या छाप्यात सापडला नव्हता. या छाप्यात अटक करण्यात आलेल्या काही मोठ्या एजंटच्या मोबाईल कॉल डिटेल्स क्राईम ब्रँचकडून तपासली असता पप्पू सावला याच्या ते सतत संपर्कात असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पप्पू सावला याला क्राईम ब्रँचने समन्स पाठविला होता.
5 सप्टेंबर रोजी क्राईम ब्रँचमध्ये चौकशीला उपस्थित राहण्यास सावला याला बजावण्यात आले होते. त्याप्रमाणे सावला बुधवारी सकाळी क्राईम ब्रँचमध्ये हजर राहिला. निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी त्याची 6 तास चौकशी केली. तसेच त्याला पुन्हा चौकशीला हजर राहावे लागणार असल्याचे बजावण्यात आले आहे.