फेसबुक लाईव्ह करताना भावूक; मनोज परबांनी मागितली माफी

By पूजा प्रभूगावकर | Updated: December 1, 2023 13:42 IST2023-12-01T13:42:11+5:302023-12-01T13:42:45+5:30

मात्र, आता त्यांनी यासाठी सर्वांची माफी मागितली आहे.

Manoj Parb apologized during emotional Facebook Live | फेसबुक लाईव्ह करताना भावूक; मनोज परबांनी मागितली माफी

फेसबुक लाईव्ह करताना भावूक; मनोज परबांनी मागितली माफी

पणजी : आरजी कार्यकर्त्यांना फेसबुक लाईव्हव्दारे संबोधित करताना पक्षाचे नेते मनोज परब हे गुरुवारी बरेच भावूक झाले. मात्र, आता त्यासाठी त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. काहीजण आरजीची विविध मार्गे बदनामी करीत आहेत. मात्र, तुम्ही विचलित होऊ नका असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. यावेळी भावूक होऊन त्यांना रडू कोसळले होते. मात्र, आता त्यांनी यासाठी सर्वांची माफी मागितली आहे.

आपल्याला केवळ आरजी परिवार एकत्र व मजबूत राहिलेला हवा असेही त्यांनी नमूद केले. काही दिवसांपासून आरजी विरोधात बदनामीची मोहीम उघडण्यात आली आहे. त्यांच्यावर सतत आरोप होत आहेत. त्यामुळे आरजी कार्यकर्त्यांचेही खच्चीकरण होत असल्याने मनोज हे भावूक झाले होते. काही झाले तरी आपल्या तत्वांशी तडजोड करणार नाही. आपल्याला केवळ तुमची साथ पहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
 

Web Title: Manoj Parb apologized during emotional Facebook Live