शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 14:33 IST

ज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे

- सद्गुरू पाटीलज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे, त्या काळात मनोहर पर्रीकर यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविण्याचे काम सुरू केले होते. पंच म्हणून किंवा सरपंच म्हणून एखादा कार्यकर्ता जर निवडून आला तर, पर्रीकर त्याच्याकडे जाऊन त्या कार्यकर्त्याचे अभिनंदन करत असत. खूप प्रारंभी श्रीपाद नाईक हे एकटेच आडपईमध्ये भाजपचे सरपंच होते. नंतरच्या काळात सदानंद शेट तानावडे वगैरे भाजप कार्यकर्ते सरपंच बनले. तानावडे हे पीर्ण पंचायतीवर निवडून यायचे. तिथे ते सरपंचही झाले होते, त्या वेळी पर्रीकर यांच्याविषयी आलेला अनुभव तानावडे अनेकदा सांगतात. पर्रीकरांनी प्रारंभीच्या काळात कायम सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला व तो संपर्क वाढवत नेला. म्हणून ते पूर्ण गोव्याचे नेते बनले. पायाला चक्रे लावल्याप्रमाणे पर्रीकर कायम गोवाभर खेड्यापाड्यांत फिरले. काणकोण किंवा सांगेच्या टोकाला सकाळी कधीही भाजपचा किंवा सरकारी कार्यक्रम असो. पर्रीकर त्या कार्यक्रमाला पोहचायचेच व दिवसभर कामासाठी वेळ देऊन रात्री उशिरा घरी पोहचले तरी, दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी लवकर त्यांचे काम पुन्हा सुरू व्हायचे. फार दुर्मिळ असे हे गुण आहेत, असे तानावडे नमूद करतात.पर्रीकर त्या वेळी म्हणजे ९० च्या दशकात अनेकदा आमच्या घरी येत होते. आपले अभिनंदन करत असत. मी पंचायतीवर निवडून येतो, सरपंच होतो, याचे त्यांना त्या वेळी कौतुक वाटायचे. पर्रीकर यांनी भाजपमध्ये त्याकाळी मला प्रोत्साहन दिले. पर्रीकर एरव्ही कठोर दिसत असले तरी, ते काहीवेळा भावूकही व्हायचे व मी स्वत: तसा अनुभव घेतलेला आहे. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अचानक मला रात्रीच्यावेळी तिकीट जाहीर केले गेले होते. ती निवडणूक मी हरलो. मात्र, नंतरची निवडणूक मी जिंकलो व आमदार झालो. पर्रीकर यांचे मार्गदर्शन मला कायम लाभले. भाजपचा एखादा सोहळा जर आयोजित करायचा झाला तर, पर्रीकर छोट्या छोट्या व्यवस्थापनातही बारकाईने लक्ष घालतात व सोहळा यशस्वी व्हावा म्हणून प्रचंड कष्ट घेतात, असा अनुभव मला मी राज्यस्तरीय पदाधिकारी बनल्यानंतरही कायम आला. ते मुख्यमंत्री म्हणून काम करताना खूप व्यस्त असायचे; पण पक्षाचा एखादा कार्यक्रम, सभा, मेळावा आयोजित करत असताना ते अनेकदा आम्हाला फोन लावून तयारी कुठवर पोहचली आहे याची माहिती घ्यायचे. ते कामय पक्षाचाच विचार करायचे, असे तानावडे सांगतात.माझे लग्न ठरले तेव्हा बेळगावला लग्नाचे साहित्य आणण्यासाठी मला जायचे होते. मी तेव्हा साधा कार्यकर्ता होतो. तेव्हा भाजपमध्ये पर्रीकरांकडेच चारचाकी वाहन होते. मी बेळगावला जात असल्याचे पर्रीकरांना सांगितले व पर्रीकरांनी वाहन दिले. ते घेऊन मी लग्नाचे साहित्य घेऊन आलो होतो. त्याकाळी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा प्रकारे पर्रीकर यांचा आधार वाटायचा, असे तानावडे यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा