पाइपलाइनद्वारे गॅसबाबत मुख्य सचिवांकडून आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:11 IST2026-03-26T14:11:12+5:302026-03-26T14:11:43+5:30

मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली.

lpg gas cylinder crisis chief secretary reviews pipeline gas in goa | पाइपलाइनद्वारे गॅसबाबत मुख्य सचिवांकडून आढावा

पाइपलाइनद्वारे गॅसबाबत मुख्य सचिवांकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : घरगुती ग्राहक तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅन्टीनमालकांनी पाइपलाइनद्वारे होणाऱ्या नैसर्गिक वायू जोडण्या घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. व्यावसायिक आस्थापनांना पुरवठा आणखी २० टक्क्यांनी वाढवून ४० टक्क्यांवर नेता येईल, यासाठी काल मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली.

नागरी पुरवठा सचिव संजीव गडकर, खात्याचे संचालक जयंत तारी, उपसंचालक अमित सावंत तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तिसवाडी आणि फोंडा परिसरात पाईप्ड नॅचरल गॅस कनेक्शन्स उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून अशा प्रकारची व्यवस्था तात्काळ करावीत, असे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने काल बैठक बोलावण्यात आली होती.

मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे एलपीजी पुरवठ्यावर मर्यादा येत असल्याने व्यावसायिकांनी पाइपलाइनच्या नैसर्गिक वायूकडे वळावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. काही ठिकाणी जोडण्या देण्यासाठी पाइपलाइन टाकाव्या लागतील.

तेथे बांधकाम खाते, पालिका किंवा महापालिका कमी वेळेत परवाने देईल. उत्तर गोव्यात गोवा नॅचरल गॅस प्रा. लि, (गेल) व भारत पेट्रोलियमने या संकटाच्या काळातही घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना पाइलपलाइनव्दारे अखंड नैसर्गिक वायू पुरवठा सुरू ठेवला आहे. विद्यमान ग्राहकांकडून या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असून कोणतीही अडचण किंवा त्रास जाणवत नसल्याचे सांगितले जाते.

फोंडा व तिसवाडी भागात व्यावसायिकांनी लवकरात लवकर अर्ज करून ही सेवा सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत पाइपलाइनचा नैसर्गिक वायू अधिक किफायतशीर असतो. कोणतीही साठवणूक किंवा रिफिलची गरज नाही.
 

Web Title : पाइपलाइन गैस आपूर्ति की मुख्य सचिव द्वारा समीक्षा; विस्तार को प्रोत्साहन

Web Summary : एलपीजी को प्रभावित करने वाले मध्य पूर्व तनाव के कारण गोवा घरों और व्यवसायों के लिए पाइपलाइन प्राकृतिक गैस कनेक्शन को प्रोत्साहित करता है। 40% तक विस्तार की योजना है। मौजूदा उपयोगकर्ताओं ने निर्बाध आपूर्ति से संतुष्टि व्यक्त की। एलपीजी सिलेंडरों की तुलना में पाइपलाइन गैस अनुकूल है।

Web Title : Chief Secretary Reviews Piped Gas Supply; Expansion Encouraged

Web Summary : Goa encourages piped natural gas connections for homes and businesses due to Middle East tensions affecting LPG. Expansion to 40% is planned. Existing users report satisfaction with uninterrupted supply. Favorable pipeline gas compared to LPG cylinders.