लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 19:32 IST2019-03-22T19:29:54+5:302019-03-22T19:32:47+5:30

सुमारे अर्धा तास त्या पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात, भाऊ अवधूत तसेच पर्रीकर यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत होत्या, असे भाजपच्या ज्येष्ठ स्थानिक नेत्याने सांगितले.  

Lok Sabha Speaker Sumitra Mahajan presented the Parrikar family to him | लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट 

लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट 

ठळक मुद्देपर्रीकर यांच्या पार्थिवावर १८ रोजी अंत्यसंस्कार झाले.महाजन यांच्यासोबत पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर तसेच भाजपचे अन्य पदाधिकारीही होते. 

पणजी - लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज दुपारी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या दोनापॉल येथील निवासस्थानी भेट देऊन पर्रीकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्रीही होते. सुमित्रा महाजन यांनी दिल्लीतील आठवणींना उजाळा दिला. सुमारे अर्धा तास त्या पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात, भाऊ अवधूत तसेच पर्रीकर यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत होत्या, असे भाजपच्या ज्येष्ठ स्थानिक नेत्याने सांगितले.  

पर्रीकर यांच्या पार्थिवावर १८ रोजी अंत्यसंस्कार झाले. परंतु त्यावेळी आपल्याला गोव्यात येणे शक्य झाले नाही म्हणून आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आल्याचे महाजन म्हणाल्या. महाजन यांच्यासोबत पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर तसेच भाजपचे अन्य पदाधिकारीही होते. 

Web Title: Lok Sabha Speaker Sumitra Mahajan presented the Parrikar family to him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.