लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 17:11 IST2019-03-22T17:11:39+5:302019-03-22T17:11:56+5:30

पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्रीही होते.

Lok Sabha Speaker Sumitra Mahajan meet Parrikar family | लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट

पणजी : लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज दुपारी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या डोनापावला येथील निवासस्थानी भेट देऊन पर्रीकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. 


पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्रीही होते. सुमित्रा महाजन यांनी दिल्लीतील आठवणींना उजाळा दिला. सुमारे अर्धा तास त्या पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात, भाऊ अवधूत तसेच अन्य सदस्यांसोबत होत्या, असे भाजपच्या ज्येष्ठ स्थानिक नेत्याने सांगितले.  


पर्रीकर यांच्या पार्थिवावर १८ रोजी अंत्यसंस्कार झाले. परंतु त्यावेळी आपल्याला गोव्यात येणे शक्य झाले नाही म्हणून आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आल्याचे महाजन म्हणाल्या.


महाजन यांच्यासोबत पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर तसेच भाजपचे अन्य पदाधिकारीही होते.

Web Title: Lok Sabha Speaker Sumitra Mahajan meet Parrikar family