पत्रादेवीत ३० लाखांची दारू जप्त, पेडणे अबकारी खात्याची कारवाई

By मयुरेश वाटवे | Updated: March 31, 2024 17:06 IST2024-03-31T16:54:17+5:302024-03-31T17:06:59+5:30

दारूची एकूण किंमत ३० लाख रुपये, तर कंटेनरची किंमत १२ लाख रुपये अशी एकूण ४२ लाखांची दारू वाहनासहित जप्त करण्यात आली.

Liquor worth 30 lakh seized in Patradevi, Pedane excise department action | पत्रादेवीत ३० लाखांची दारू जप्त, पेडणे अबकारी खात्याची कारवाई

पत्रादेवीत ३० लाखांची दारू जप्त, पेडणे अबकारी खात्याची कारवाई

 निवृत्ती शिरोडकर

पेडणे : पेडणे अबकारी खात्यातर्फे पत्रादेवी तपासणी नाक्यावर एकूण ४२ लाखांची चोरटी दारू जप्त करण्यास अबकारी अधिकाऱ्यांना यश आले. एकूण १२५० बॉक्समध्ये दारू होती.

दारूची एकूण किंमत ३० लाख रुपये, तर कंटेनरची किंमत १२ लाख रुपये अशी एकूण ४२ लाखांची दारू वाहनासहित जप्त करण्यात आली. ही कारवाई दि. ३१ रोजी घडली.

चोरटी दारू गोवामार्गे महाराष्ट्रात जात असताना अबकारी अधिकारी राजेश नाईक, जयेश बांदेकर, वासुदेव गावस, विशाल गावस, जितेंद्र गावस, लाडू गावकर, तुकाराम सांगळे आदींनी ही कारवाई केली

Web Title: Liquor worth 30 lakh seized in Patradevi, Pedane excise department action