गुजरात नेली जाणारी दारु मडगावच्या रेल्वे स्थानकावर जप्त; दोघे अटकेत

By सूरज.नाईकपवार | Updated: November 1, 2023 12:34 IST2023-11-01T12:32:59+5:302023-11-01T12:34:43+5:30

संशयितांकडे १९० दारुच्या बाटल्या सापडल्या.

liquor being transported to gujarat seized at madgaon railway station both are under arrest | गुजरात नेली जाणारी दारु मडगावच्या रेल्वे स्थानकावर जप्त; दोघे अटकेत

गुजरात नेली जाणारी दारु मडगावच्या रेल्वे स्थानकावर जप्त; दोघे अटकेत

सूरज नाईक-पवार, लोकमत न्युज नेटवर्क,  मडगाव: गोव्यातून गुजरातला दारु नेणाऱ्या दोघांना कोकण रेल्वे पोलिसांनी मडगावात पकडले. गोपालभाई सोळंकी (३८) व मनोहर खामादिया (१९) असे संशयितांची नावे असून, त्यांच्याकडे १५ हजार २५६ रुपयांची दारु जप्त केली.

संशयितांकडे १९० दारुच्या बाटल्या सापडल्या. मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयितांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी त्यांच्या बॅगेची छडती घेतली असता, त्यात दारुच्या बाटल्या सापडल्या. संशयित गुजरात राज्यातील सुरेंद्र नगर येथील आहेत. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोज मांद्रेकर, हवालदार सत्यवान नाईक, समीर शेख, कुलदीप गावकर, श्रीनिवास रेड्डी , अमरदीप चौधरी यांनी ही कारवाई केली. जप्त केलेली दारु अबकारी खात्याच्या ताब्यात देण्यात आली आहे.

Web Title: liquor being transported to gujarat seized at madgaon railway station both are under arrest