शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

से-क्स स्कँडलचा धडा, २० वर्षीय सोहम नाईक कसलेल्या सराईत गुन्हेगारासारखा वागतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:43 IST

एक वीस वर्षांचा युवक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करतो. एक-दोन नव्हे, तर पंचवीस-तीस युवतींना फसवतो, असा आरोप आहे.

एक वीस वर्षांचा युवक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करतो. एक-दोन नव्हे, तर पंचवीस-तीस युवतींना फसवतो, असा आरोप आहे. केवळ लैंगिक शोषण करून तो थांबत नाही, तर त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करतो. त्यानंतरही तो आणखी पुढचे पाऊल उचलतो. आपल्या मित्रांना ते व्हिडीओ दाखवतो. इतरांशी व्हिडीओ शेअर करतो. सराईत व कसलेल्या गुन्हेगाराप्रमाणे तो वागतो. 

केवळ वीस वर्षांचा मुलगा असा अचानक एक-दोन दिवसांत गुन्हेगार होत असतो का? त्याच्या अवतीभवतीचा समाज, त्याचे सहकारी, मित्रमंडळी, पालक या सर्वांनाच मोठा धक्का बसला असेल. सोहम नाईकचे हे कृत्य ऐकून व वाचून त्यांनाही खूप वेदना झाल्या असतील. अनेकदा संगत हीच खूप धोकादायक असते. घातक असते. सोहम नाईकने ज्यांची संगत केली, ज्यांनी सोहमची साथ दिली, ते सर्वजण कमी-अधिक प्रमाणात दोषी आहेत. गोव्यात एवढे मोठे प्रकरण एखाद्या वीस वर्षीय युवकाकडून कधीच घडले नव्हते. अल्पवयीन मुलींना हेरून व नादी लावून त्यांच्या शोषणाचे चित्रीकरण करून ते शेअर करणे हा फारच गंभीर गुन्हा आहे. आतापर्यंत एखाद्या दुसऱ्या राज्यात अशी घटना घडल्याचे आपल्या वाचनात यायचे किंवा मसाला सिनेमांमध्ये अशी कृत्ये दाखवली जायची. आता चक्क कुडचडेत हे घडले. एका नगरसेवकाच्या मुलाने हे कृत्य केले, यामुळे सगळीकडेच खळबळ माजली आहे. गोव्याबाहेरही या प्रकरणाची प्रचंड चर्चा सुरू आहे. या प्रकरणाने अनेक युवकांना व एकूणच समाजालाही धडा मिळाला आहे.

पंधरा ते वीस या वयात मुलांची खरी जडणघडण होत असते. शारीरिक बदल होत असतात. हार्मोनल चेंजेस असा उल्लेख अनेकदा केला जातो. अशावेळी युवक-युवर्तीना पालकांकडून योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मूल्यशिक्षणाचीही आवश्यकता असते. उंची कपडे घालून महागड्या गाड्या उडवत फिरणारे युवक जातात कुठे, करतात काय, ते घरी कधी परततात, यावर पालकांचे लक्ष असायलाच हवे. खरे म्हणजे हाच मुख्य धडा सर्वच कुटुंबांना सोहम नाईक प्रकरणाने दिला आहे.

अनेक ठिकाणी काही गोंयकार युवकांना ड्रग्जचेही व्यसन जड्डू लागलेय. ९०च्या दशकात तरुणांमध्ये 'एचआयव्ही'ची लागण वाढतेय, अशी चर्चा व्हायची. तो काळ गेला. बऱ्याच जागृतीनंतर ती संख्या घटली. आता स्थानिक युवकदेखील ड्रग्ज विक्री करतात किंवा ड्रग्जच्या नशेत आढळतात, अशी माहिती पोलिस देत असतात. काहीजण पकडलेही जातात. 

सायंकाळच्या वेळी काही अत्यंत कमी वर्दळीच्या ठिकाणी किंवा कोपऱ्यात युवकांची टोळकी बसलेली आढळतात. हे बसणे म्हणजे दारू पिणे असते किंवा ड्रग्जची नशा करणे. याकडे आता पालकांनी, सरकारने व पोलिस यंत्रणेने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अर्थात सगळी जबाबदारी सरकारी यंत्रणेवर घालता येणार नाही. कोलवाळसारख्या तुरुंगातदेखील आरामात ड्रग्ज पोहोचतात किंवा तिथे वारंवार ड्रग्ज पकडले जातात. यावरून स्थिती कोणत्या थराला गेली आहे, हे कळून येते. लैंगिक अत्याचार किंवा अल्पवयीनांवरील बलात्कार या घटना रोजच घडू लागल्या आहेत. काहीवेळा संवेदनशील माणसाचे डोकेही बधिर होऊन जाते. पूर्वी स्थलांतरित मजूर हेच गुन्हेगार आहेत, अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, अलीकडे लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये अनेक स्थानिक व्यक्ती सापडू लागल्या आहेत.

पार्त्या करत मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत झिंगणे हे तर अनेक श्रीमंत कुटुंबांतील तरुणांचे कामच झालेले आहे. आईवडील कष्ट करतात आणि मुले तो पैसा उधळतात. पणजी व आसपासच्या परिसरातील काही कथित उच्चभ्रू कुटुंबांतील तरुण कळंगुट, कांदोळी येथे पार्थ्यांमध्ये नाचताना दिसतात. गोवा सरकारला मध्यंतरी सनबर्नसारखे सोहळे प्रचंड प्रिय झाले होते. पैसे चारून सगळे परवाने मिळविले जातात. अगदी पेडणेसारख्या भागातही इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल आयोजित करायला सरकारनेच मान्यता दिली होती. ड्रग्जचा वापर होतोय हे ठाऊक असूनही सरकार भोगसंस्कृतीला पोषक असे वातावरण तयार करतेय. मग त्या वातावरणातून जी विकृती तयार होते किंवा सोहमसारखे युवक निर्माण होतात, तेव्हा थोडा तरी दोष सत्ताधाऱ्यांकडेही जातोच. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Sex Scandal: 20-Year-Old Acts Like Seasoned Criminal, Lesson Learned

Web Summary : A 20-year-old in Goa allegedly sexually assaulted and filmed underage girls, sharing the videos. This incident, involving a politician's son, has sparked outrage and serves as a harsh lesson about parental vigilance, peer influence, and the dangers of Goa's drug and party culture.
टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी