शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांना ‘गोमंत विभूषण’

By admin | Updated: May 30, 2014 02:22 IST

पणजी : ज्येष्ठ गोमंतकीय पत्रकार, लेखक व स्वातंत्र्यसैनिक लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांना राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्याने गुरुवारी

पणजी : ज्येष्ठ गोमंतकीय पत्रकार, लेखक व स्वातंत्र्यसैनिक लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांना राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्याने गुरुवारी २०१३-१४ सालचा ‘गोमंत विभूषण’ हा गोव्यातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला. रोख रुपये पाच लाख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गौरवलेख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कला व संस्कृती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी गुरुवारी सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मास्कारेन्हास यांच्या नावाची घोषणा केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, किशोरी आमोणकर अशी चार-पाच नावे या पुरस्कारासाठी सुचविण्यात आली होती. तथापि, मास्कारेन्हास हे गोव्यात राहात असल्याने गोमंतकीय रहिवाशालाच प्राधान्य द्यावे, असा विचार आम्ही केला व मास्कारेन्हास यांच्या नावाची निवड केली, असे मांद्रेकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर आलेल्या नावांवर विचार केला गेला व मास्कारेन्हास यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले. यापूर्वी शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, वास्तुरचनाकार चार्ल्स कुरैय्या यांना ‘गोमंत विभूषण’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रथमच एका पत्रकाराला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जगभरात अनेक गोमंतकीय राहतात. त्यांनी कला व अन्य क्षेत्रांत खूप योगदान दिले आहे व खूप पैसाही कमावला आहे; पण जी व्यक्ती गोव्यातच राहते, त्या व्यक्तीला ‘गोमंत विभूषण’साठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे मंत्री मांद्रेकर यांनी सांगितले. मास्कारेन्हास यांनी आता वयाची शंभरी गाठली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या वाढदिनीच त्यांना पुरस्कार वितरित करण्याचा प्रयत्न आहे. (खास प्रतिनिधी)