Konkan Railway is ready to prevent the inconvenience of passengers during Ganesh Chaturthi | चतुर्थीच्यावेळी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज
चतुर्थीच्यावेळी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

ठळक मुद्देदादर - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला 30  ऑगस्टपासून सावंतवाडी रेलस्थानकावर थांबा दिला आहे. याचा खादयपदार्थ स्टॉलवर बेबी फुड उपलब्ध असेल तसेच ज्यादा टेबले व मोबाईल ट्रॉलीसही उपलब्ध असेल.

मडगाव - चतुर्थीच्या वेळी रेल्वे प्रवाशांची गैरसोय होउ नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर नियोजित रेलगाडयाबरोंबरच खास रेल्वे गाडया सुरु केल्या आहेत. 210 फे:या या खास रेल्वे या मार्गावर मारणार आहेत. तसेच या मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाडयांना 647 अतिरिक्त डबेही जोडले गेले आहेत.  त्याशिवाय गाडी क्रमांक 12051/ 12052 दादर - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला 30  ऑगस्टपासून सावंतवाडी रेलस्थानकावर थांबा दिला आहे. याचा 7 लाखांहून अधिक प्रवाशांना लाभ होणार आहे.
तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग खिडक्या उघडयाण आल्या आहेत. तसेच अकरा टपाल खात्यात आरक्षण सुविधा, सतरा रेल स्थानकात पीआरएस सिस्टिम व 16 ठिकाणी टाउन बुकींग एजन्सी सुरु केली आहे. तिकीट तपासणी कडक केली जाणार आहे. खादयपदार्थ स्टॉलवर बेबी फुड उपलब्ध असेल तसेच ज्यादा टेबले व मोबाईल ट्रॉलीसही उपलब्ध असेल.
खेड, कणकवली व कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रथोमपचार सुविधा असेल, त्याशिवाय चिपळूण, रत्नागिरी, थिवी, वेर्णा, मडगाव, कारवार व उडुपी रेल्वे स्थानकावर आरोग्य कक्ष असेल. सप्टेंबर महिन्याच्या 2 ते 12 र्पयत हे कक्ष असेल. सुरक्षतेच्या दृष्टीने कुठलीही कमतरता राहू नये यासाठी रेल्वे सरंक्षण खास फॉर्सची एक कंपनी तैनात केली आहे. या कंपनीला रेल्वे सुरक्षा दल सहकार्य करेल. कोकण रेल्वे महामंडळाच्या अन्य स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मुख्य रेल्वे स्थानकावर तैनात केले जाणार आहे. सुरक्षतेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे एकूण 204 जवान व होमगार्डचे जवान तैनात करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान व स्थानिक पोलीस सुरक्षतेवर लक्ष ठेवणार आहे. व्टिवटर व आखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 182 हून येणा:या संदेशाची  त्वरीत दखल घेण्यासाठी या जवानांना मार्गदर्शन केले गेले आहे.

Web Title: Konkan Railway is ready to prevent the inconvenience of passengers during Ganesh Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.