गोव्यात कोकण रेल्वे पोलिसाला मारहाण: संशयित गजाआड

By सूरज.नाईकपवार | Updated: September 14, 2023 12:01 IST2023-09-14T12:01:31+5:302023-09-14T12:01:35+5:30

भादंसंच्या ३३२ कलमाखाली कोकण रेल्वे पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

Konkan Railway Police assaulted in Goa: Suspect assaulted | गोव्यात कोकण रेल्वे पोलिसाला मारहाण: संशयित गजाआड

गोव्यात कोकण रेल्वे पोलिसाला मारहाण: संशयित गजाआड

मडगाव: गोव्यातील मडगाव येथे कोकण रेल्वे पोलिस ठाण्यातील श्रीनिवास रेड्डी या पोलिसाला मारहाण करण्याची घटना बुधवारी सांयकाळी घडली. या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी रमेश लक्ष्मण नाईक (३९) याला अटक केली आहे. संशयित मूळ कर्नाटकातील भटकल येथील असून, सदया तो चाररस्ता मांडोप येथे रहात आहे. 

भादंसंच्या ३३२ कलमाखाली कोकण रेल्वे पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विन्टन आरावजो पुढील तपास करीत आहेत.बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान मारहाणीची वरील घटना घडली. तक्रारदार रेड्डी हे साध्यावेशात मडगाव रेल्वे स्थानकात पेट्रोलिंगवर होते. ते कामावर असताना, संशयिताने त्याच्याशी भांडण करुन त्यांना मारहाण केली. यात रेड्डी यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली.

Web Title: Konkan Railway Police assaulted in Goa: Suspect assaulted