शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

श्री गणेश जयंतीचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 07:19 IST

श्री गणेशाची उपासना म्हणजे बाह्य उत्सवापुरती मर्यादित कृती नसून, अंतःकरणातील विकार दूर करून विवेकबुद्धी जागृत करण्याची साधना आहे.

संकलन- तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था

माघ शुद्ध चतुर्थी दिवशी श्री गणेश लहरी प्रथम पृथ्वीवर अवतरल्या, म्हणून हा दिवस 'श्री गणेश जयंती' म्हणून साजरा केला जातो. इंग्रजी महिन्यानुसार यावर्षी २२ जानेवारीला श्री गणेश जयंती आहे. चतुर्थी तिथीला श्री गणेश तत्त्व अधिक कार्यरत असल्याने या दिवशी केलेली पूजा, आरती, स्तोत्रपठण व नामजप भक्ताला अधिक आध्यात्मिक लाभ देतो.

गणेश जयंती अन् गणेश चतुर्थी यातील नेमका फरक माहिती आहे का? पुराण कथा वाचा, संभ्रम दूर करा!

सनातन धर्मानुसार प्रत्येक देवता ही केवळ पूजेची प्रतिमा नसून ती एक चैतन्यमय, सूक्ष्म तत्त्व आहे. श्री गणेशाची उपासना म्हणजे बाह्य उत्सवापुरती मर्यादित कृती नसून, अंतःकरणातील विकार दूर करून विवेकबुद्धी जागृत करण्याची साधना आहे. श्री गणेश जयंतीचा अधिक लाभ होण्यासाठी पूजेच्या प्रारंभी मन एकाग्र करून नम्र भावाने प्रार्थना करावी. "हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती शुद्ध भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजेतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे." 

२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख

श्री गणेशाला अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाच्या आज्ञा चक्राच्या स्पर्शाने आपल्या मनातील खळबळ स्थिरावली असून आपले मन शांत झाले आहे, असा भाव ठेवावा. अंगठा व अनामिका यांच्या चिमटीत प्रथम हळद आणि नंतर कुंकू घेऊन श्री गणेशाच्या चरणावर अर्पण करावे. या मुद्रेमुळे पूजकात भक्तिभाव जागृत होतो. श्रीगणेशाला लाल जास्वंद वा अन्य लाल फुले शंकरपाळ्याच्या रचनेत वहावी. फुले वाहताना मनात श्री गणेशाच्या तेजस्वी तत्त्वाचे स्मरण करावे. 

श्री गणेश त्याचे तेज आपल्याला या लाल फुलांच्या माध्यमातून देत आहे असे अनुभवावे. कोवळ्या दुर्वा वाहताना, आपल्या मनातील कोमलता आणि नम्रता अर्पण होत आहे, असा भाव असावा. श्री गणेश पूजनात चंदन, केवडा किंवा चमेली गंधाची उदबत्ती असावी. श्री गणेशाला हीना गंधाचे अत्तर अर्पण करावे.

गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास! 

श्रीसमर्थ रामदासस्वामी लिखित चैतन्यमय 'सुखकर्ता दुःखहर्ता' आरती म्हणताना प्रत्येक ओळ आर्ततेने म्हणावी. दिवसभरातील प्रत्येक कृती करताना 'श्री गणेशाय नमः' हा नामजप अधिकाधिक करावा. नामजपामुळे मनातील अनावश्यक विचार कमी होऊन, दिवसभर उत्साह आणि आनंद अनुभवता येतो.मनुष्य उत्सवप्रिय आहे. पण काही मंदिरामध्ये श्री गणेश जयंतीला फुग्याची आरास, केक कापून प्रसाद वितरण, गणेश जयंतीच्या मिरवणुकीत डिजे असे प्रकार दिसतात. यामुळे सात्विकता व चैतन्य कमी होऊन रज-तमाचे प्रमाण वाढते. 

१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा

देवतांचे विडंबन होते. मंदिरे ही चैतन्याची केंद्रे असल्याने तेथील वातावरण सात्विकच असायला हवे. शास्त्र समजून घेऊन, भक्तिभावाने केलेल्या पूजनात नक्कीच आनंद अनुभवता येतो आणि ईश्वराची कृपा संपादन करण्यास मदत होते. यंदाची गणेश जयंती भक्तिसागरात साजरी करूया. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shree Ganesh Jayanti: Significance, Rituals, and Spiritual Benefits Explained

Web Summary : Shree Ganesh Jayanti marks the arrival of Ganesh waves on Earth. It emphasizes devotion, purification, and connecting with Ganesh's energy through rituals. Offerings like red flowers and Durva grass are symbolic. Avoid modernization that diminishes spirituality, and focus on traditional practices for divine grace.
टॅग्स :ganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५vinayak chaturthiविनायक चतुर्थीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीspiritualअध्यात्मिक