मातेकडून पोटच्या ४ वर्षीय बाळाची हत्या, महिलेला अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: January 8, 2024 17:24 IST2024-01-08T17:22:50+5:302024-01-08T17:24:47+5:30

खून करुन पळून गेलेल्या त्या महिलेला चित्रदुर्ग येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कळंगुट पोलिसांकडून देण्यात आली.

Killing of the unborn child by the mother | मातेकडून पोटच्या ४ वर्षीय बाळाची हत्या, महिलेला अटक

मातेकडून पोटच्या ४ वर्षीय बाळाची हत्या, महिलेला अटक

म्हापसा: कळंगुट पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या कांदोळी पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सिकेरी येथे एका मातेने आपल्या पोटच्या ४ वर्षीय बाळाचा खून करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून करुन पळून गेलेल्या त्या महिलेला चित्रदुर्ग येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कळंगुट पोलिसांकडून देण्यात आली.

सदर संशयित महिला ज्या हॉटेलात उतरली होती त्या हॉटेलात आपल्या बाळाचा खून केल्यानंतर मृतदेह बॅगेत भरून हॉटेलातून पळ काढला. नंतर तेथून थेट टॅक्सीतून बसस्थानक गाठले.  संबंधीत हॉटेलचा कर्मचारी ज्यावेळी त्या महिलेने बुक केलेल्या खोलीत गेला तेव्हा त्याला त्या खोलीत सर्वत्र रक्त पसरल्याचे आढळून आले. त्यानी नंतर घटनेची कल्पना हॉटेलच्या व्यवस्थापनाला दिली. व्यवस्थापनाने नंतर कळंगुट पोलिसांना कळवले.

पोलिसांनी तातडीने हालचाली करुन टॅक्सी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. ती महिला चित्रदुर्ग बसने गेल्याचे समजतात कळंगुट पोलिसांनी तेथील पोलिसांना महिलेची माहिती पुरवली आहे. तेथील पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात अटक केली असून त्या महिलेला ताब्यात घेण्यासाठी कळंगुट पोलिसांचेपथक चित्रदुर्गला रवाना झालेअसल्याची माहिती निरीक्षक परेश नाईक यांनी दिली आहे.

Web Title: Killing of the unborn child by the mother