शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गोव्यात सत्तेची चावी घटक पक्षांच्याच हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 2:31 PM

गोव्यात पडद्यामागून ब-याच राजकीय हालचाली सुरू असून विरोधी काँग्रेस पक्षही सत्ता बदलासाठी खूप सक्रीय झालेला आहे.

- सदगुरू पाटील

पणजी : गोव्यात पडद्यामागून ब-याच राजकीय हालचाली सुरू असून विरोधी काँग्रेस पक्षही सत्ता बदलासाठी खूप सक्रीय झालेला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे एम्स इस्पितळामधून कधी बाहेर येऊ शकतील याची कल्पना कुणालाच नसल्याने व बहुतेक मंत्री, आमदार राजकीय लॉबिंगमध्येच दंग असल्याने प्रशासनाचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र काहीही झाले तरी, शेवटी गोव्यातील सत्तेची चावी ही भाजपाच्या नव्हे तर भाजपाप्रणीत आघाडीतील दोन घटक पक्षांच्याच हाती आहे, असा निष्कर्ष प्राप्त स्थितीत काढावा लागतो.

भाजपाकडे मुख्यमंत्रीपद असले तरी, त्या पक्षाकडे चाळीस सदस्यीय विधानसभेत फक्त चौदाच आमदार आहेत. त्या चौदापैकी एकटे सभापतींच्या खुर्चीवर बसतात आणि तिघे इस्पितळात आहेत. विधानसभेत जर सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले गेले तर तीनपैकी दोन आमदार मतदानासाठी विधानसभेत येऊही शकणार नाहीत. सध्या भाजपाकडे अकराच आमदारांचे संख्याबळ असल्यासारखी स्थिती आहे. अमेरिकेत उपचार घेत असलेले ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे 15 ऑक्टोबरनंतर गोव्यात पोहोचतील असे सांगण्यात येते. मुंबईतील इस्पितळात गेले चार महिने उपचार घेत असलेले वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याशी सरकारचा आणि सत्ताधारी भाजपाचाही काहीच संपर्क राहिलेला नाही.

सत्तेची चावी सध्या तरी भाजपाप्रणीत आघाडीचे घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक ह्या दोन पक्षांच्या व तिघा अपक्षांच्या हाती आहे. मंत्री विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाने तिघा अपक्षांना सोबत घेऊन एकूण सहा आमदारांची मोट बांधलेली असल्याने फॉरवर्डचे राजकीय वजन सत्ताधारी आघाडीत वाढलेले आहे. गोव्यातील नेतृत्वाच्या स्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढला जावा, अशा प्रकारची सूचना भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांना सहा आमदारांनी मिळून केली. चाळीस सदस्यीय विधानसभेत एखाद्या गटाकडे सहा आमदार असणो हे खूप महत्त्वाचे ठरते. सहा आमदारांचे नेतृत्व करत असलेल्या नेत्याला वगळून पुढे जाता येत नाही याची कल्पना गोव्याहून दिल्लीला परतलेल्या भाजपाच्या निरीक्षकांना आली आहे. दुस-या बाजूने तीन आमदारांचा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा नेतृत्वाची तात्पुरती धुरा आपले नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपवा अशी मागणी करत आहे. मात्र ती मागणी पूर्ण होणार नाही. तथापि, दुखावलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जाऊन काँग्रेसच्या गळाला लागू नये म्हणूनही भाजपला काळजी घ्यावी लागेल. कारण काँग्रेसचे सोळा, मगोपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक असे संख्याबळ एकत्र आले व तिघा अपक्षांपैकी एक अपक्ष गळाला लागला तर काँग्रेस विधानसभेत बहुमत दाखवू शकेल.

केंद्रातील भाजपाचे नेते कोणत्याही स्थितीत तसे होऊ देणार नाही व काँग्रेसला पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसू देणार नाहीत. मात्र गोवा फॉरवर्ड व महाराष्ट्रवादी गोमंतक ह्या दोन पक्षांच्याच हाती तुर्त सगळ्य़ा चाव्या आहेत याची जाणीव गेल्या आठवडाभरातील हालचालींनंतर गोव्यातील भाजपच्या कोअर टीमलाही झालेली आहे, अशी माहिती मिळते.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरcongressकाँग्रेस