जुलैच्या पावसानं गोव्यात ६ वर्षांतील गाठला नीचांक, हवामान खात्याचा अंदाज फोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 22:54 IST2018-07-30T22:54:09+5:302018-07-30T22:54:18+5:30
जुलै महिना जोरदार बरसणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज हा फोल ठरला आहे.

जुलैच्या पावसानं गोव्यात ६ वर्षांतील गाठला नीचांक, हवामान खात्याचा अंदाज फोल
पणजी: जुलै महिना जोरदार बरसणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज हा फोल ठरला आहे. दुसरा पंधरवड्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे हा अंदाज चुकला आहे. या महिन्याच्या ३० तारीखपर्यंत केवळ ३२ इंच पावसाची नोंद झाली असल्यामुळे विक्रमी पाऊस पडण्याऐवजी सहा वर्षांतील निच्चांक गाठला आहे.
भारती हवामान खात्याच्या दुसऱ्या दीर्घ अंदाजात जुलै महिन्यात गोव्यासह इतर राज्यातही जोरदार वृष्टी होणार असल्याचे म्हटले होते. अंदाजानुसार जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने जोरदार सलामी दिली होती. पहिल्याच आठवड्यात ७ इंच पावसाची नोंद झाली होती. ६ जुलैला तर ९ इंच पाऊस पडला होता. या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दुस-या आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहिला दुसºया आठवड्यात म्हणजे १४ जुलै पर्यंत त्यात ६ इंचाची भर पडून २० इंच एवढा पाऊस झाला होता. तिस-या आठवड्यात पाऊस खूपच कमी पडला आणि शेवटच्या आठवडा तर जवळ जवळ कोरडाच गेला. त्यामुळे ३० जुलैपर्यंत केवळ ३२ इंच एवढाच पाऊस नोंद झाला. जूनमधील ४० इंच मिळून महिना संपण्यासाठी एक दिवस असताना ७२ इंच पावसाची नोंद झाली होती. जुलै मधील सर्वकालीन उच्चांक हा १९५४ मध्ये ६७.७ इंच इतका नोंदला गेला आहे.
जुलैमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे एकूण सरासरी पावसाची नोंदही कमी झाली आहे. ७२ इंच प्रमाण हे सामान्य प्रमाणापेक्षा ७ टक्क्यांनी कमी आहे. जुलै ३० पर्यंत सामान्य प्रमाण आहे ७७.७ इंच. येत्या पाच दिवसातही जोरदार पावसाची शक्यता हवामान कात्याने वर्तविलेली नाही. त्यामुळे ही तूट आणखी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही
वर्ष इंच
२०१३ ५४. ६
२०१४ ३७.७
२०१५ ३६.१
२०१६ ३६.१
२०१७ ३५.३
२०१८ ३२.३