its Necessary to discuss about hiv test says law minister nilesh cabral | एचआयव्ही चाचणीविषयी चर्चा आवश्यक- काब्राल
एचआयव्ही चाचणीविषयी चर्चा आवश्यक- काब्राल

पणजी : एचआयव्ही चाचणी सक्तीविषयी सर्वागाने समाजात चर्चा घडून येणो आवश्यक आहे, असे मत कायदा खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याकडील कायदा खाते काढून मुख्यमंत्र्यांनी ते खाते निलेश काब्राल यांच्याकडे सोपवले आहे. काब्राल यांच्याकडे दुस ऱ्यांदा कायदा खाते आले. मात्र विश्वजित यांच्याकडे कायदा खाते असताना मंत्री राणे यांनी विवाह नोंदणीवेळी गोव्यात एचआयव्ही रक्त चाचणी सक्तीची केली जाईल असे जाहीर केले होते. त्यासाठी कायदा दुरुस्ती करू, असेही राणे म्हणाले होते. विवाह नोंदणी ही कायदा खात्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे काब्राल यांना याविषयी विचारले असता, काब्राल म्हणाले की खरे म्हणजे एचएआयव्हीच्या या विषयाबाबत मला जास्त काही बोलायचे नाही, कारण एचआयव्हीची एखाद्याला लागण झालेली असणो किंवा नसणो हा व्यक्तीगत विषय आहे. सक्तीची भाषा करण्यापूर्वी समाजात सर्वबाजूने त्याविषयी चर्चा व्हायला हवी. विवाह ही देखील प्रत्येकाची व्यक्तीगत गोष्ट आहे. जर दोन व्यक्तींना एकामेकांशी लग्न होणो मान्य असेल व त्यांच्या कुटुंबांनाही ते मान्य असेल तर मग आम्ही सरकार या नात्याने विवाह नोंदणी कशी काय थांबवू शकतो असा प्रश्न येतो. तरीही या विषयाबाबत अगोदर चर्चा होऊ द्या. तत्पूर्वीच आम्ही पाऊले उचलू शकणार नाही.

कायदा खाते पुन्हा मिळाल्याने तुम्ही समाधानी आहात काय असे विचारले असता, मंत्री काब्राल म्हणाले, की समाधानाचा प्रश्न नाही. मी कायदा मंत्री असताना काही सुधारणा सुरू केल्या होत्या, त्या आता पूर्ण करता येईल. माझ्याकडे कोणतेच खाते नसेल किंवा मंत्रीपद नसेल व मी फक्त माङया मतदारसंघाचाच आमदार असेन, तेव्हा देखील मी काम करत राहीन. मी असमाधानी असणार नाही.


Web Title: its Necessary to discuss about hiv test says law minister nilesh cabral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.